Gujarat Morbi News live : गुजरातमधील मोरबी पुल दुर्घटनेत 91 जणांचा मृत्यू, तर 100 जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : गुजरातमधील राजकोटच्या मोरबी येथील मच्छू नदीवरील केबल पुल कोसळण्याची मोठी दुर्घटना आज सांयकाळी घडली होती. या भीषण अपघातात 400 ते 500 लोक केबल पुल तुटल्याने नदीत बुडाले होते. रात्री अकरा वाजेपर्यंत या अपघातात तब्बल 91 जणांचा बळी गेल्याचे समोर आले आहे. या भीषण अपघातामुळे देशावर शोककळा पसरली आहे. घटनास्थळी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी मध्यरात्री भेट दिली.

Gujarat Morbi News live, 91 killed, 100 injured in Morbi bridge collapse in Gujarat, death toll likely to rise, morbi latest news,

संपूर्ण देशात खळबळ उडवून देणारी घटना गुजरातमधून रविवारी रात्री समोर आली. या घटनेत गुजरातमधील राजकोटच्या मोरबी येथील मच्छू नदीवरील केबल पुल कोसळला. या पुलावर तब्बल 400 ते 500 जण होते. क्षमतेपेक्षा अधिक लोक झूलत्या पुलावर जमल्याने पुल कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली. घटनास्‍थळी स्थानिक प्रशासन, नागरिक आणि NDRF ची पाच पथके, हवाई दलातील गरुड कमांडो बचाव कार्यात सहभागी झाले आहेत. सेनेच्या तिन्ही दलाकडून बचावकार्य वेगाने सुरू आहे.अंधार असल्याने बचावकार्य कार्यात अडथळे येत आहेत.

Gujarat Morbi News live, 91 killed, 100 injured in Morbi bridge collapse in Gujarat, death toll likely to rise, morbi latest news,

मोरबी पुल दुर्घटनेत रात्री अकरा वाजेपर्यंत तब्बल 91 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. तसेच 100 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये लहान मुले, महिला आणि पुरूष यांचा समावेश आहे. जखमींवर विविध रूग्णालयात उपचार केले जात आहेत.

Gujarat Morbi News live, 91 killed, 100 injured in Morbi bridge collapse in Gujarat, death toll likely to rise, morbi latest news,

दरम्यान, मच्छू नदीवरील केबल पुल हा खूप जूना आहे. काही दिवसांपूर्वीच त्याची दुरुस्ती करण्यात आली होती, हा पुल तब्बल सात महिने बंद होता. पाच दिवसांपूर्वीच हा पुल नागरिकांसाठी खुला करण्यात आला होता, परंतू रविवारी पुलावर जमलेल्या शेकडो नागरिकांच्या गर्दीमुळे हा पुल कोसळण्याची दुर्घटना घडली. पुल कोसळल्याने जवळपास 500 जण पाण्यात बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Gujarat Morbi News live, 91 killed, 100 injured in Morbi bridge collapse in Gujarat, death toll likely to rise, morbi latest news,

या दुर्घटनेत 91 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मध्यरात्री, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच मोरबी केबल ब्रिज कोसळून जखमी झालेल्या रुग्णांची सीएम भूपेंद्र पटेल यांनी मोरबी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारपूस केली.

Gujarat Morbi News live, 91 killed, 100 injured in Morbi bridge collapse in Gujarat, death toll likely to rise, morbi latest news,

भारतीय नौदलाच्या 50 कर्मचार्‍यांसह, IAF चे 30 कर्मचारी, लष्कराच्या 2 तुकड्या आणि अग्निशमन दलाच्या 7 तुकड्या राजकोट, जामनगर, दीव आणि सुरेंद्रनगर येथून आधुनिक उपकरणांसह मोरबीत बचावकार्य करत आहेत. तसेच SDRF च्या 3 तसंच राज्य राखीव पोलिसांच्या (SRP) दोन तुकड्याही बचाव आणि मदतकार्य करत आहेत. राजकोट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आयसोलेशन वॉर्डही तयार करण्यात आला आहे. मध्यरात्रीपर्यंत बचाव कार्य सुरू होते.