CORBEVAX COVOVAX Molnupiravir : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय :भारतात कोरोनावरील दोन नव्या लसींसह एका गोळीच्या वापरास मंजुरी !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : देशात कोरोनाची तिसरी लाट येऊ नये यासाठी उपाययोजना सुरू असतानाच कोरोना रूग्णसंख्ये वाढ होत आहे. तसेच ओमिक्रॉनचाही उद्रेक सुरू झाला आहे. अश्यातच केंद्र सरकारने कोरोनाविरोधातल्या लढाईसाठी महत्वाची घोषणा केली असून सरकारने कोरोनावरील दोन नव्या लसी आणि एका गोळीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली.

भारतात कॉर्बेवॅक्स (CORBEVAX) आणि कोवोवॅक्स (COVOVAX) लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय, मोलनुपिरावीर (Molnupiravir) या औषधालाही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली आहे. (CORBEVAX COVOVAX Molnupiravir, Union Health Ministry’s big decision: India approves the use of one pill with two new vaccines on corona )

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Union Health Minister Mansukh Mandvi )यांनी आज ट्विट केले आहे. सर्व नागरिकांचे अभिनंदन. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आणखी एक भक्कम पाऊल टाकत, आम्ही कॉर्बेवॅक्स लस आणि कोवोवॅक्स लस या दोन लसींसह अँटी-व्हायरल औषध मोलनुपिरावीरलाही मंजुरी दिली आहे. या औषधांना आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे, असे मनसुख मांडविया यांनी म्हटले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी पुढील ट्विटमध्ये लिहिले की, कॉर्बेवॅक्स लस ही हैदराबादस्थित फर्म बायोलॉजिकल-ईने बनवलेली कोरोनाविरुद्धची भारतातील पहिली स्वदेशी विकसित RBD प्रोटीन सब-युनिट लस आहे. ही हॅट्ट्रिक आहे! आता तिसरी लस भारतात विकसित झाली आहे. तसेच, नॅनोपार्टिकल लस, कोवोवॅक्सची निर्मिती पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाद्वारे करण्यात येणार आहे, असे मनसुख मांडविया यांनी म्हटले आहे.

याचबरोबर, मोलनुपिरावीर हे कोरोनाच्या वयस्कर रूग्णांच्या उपचारासाठी आणि ज्यांना रोग वाढण्याचा उच्च धोका आहे, अशा रुग्णांच्या उपचारासाठी आपत्कालीन परिस्थितीत प्रतिबंधित वापरासाठी देशातील 13 कंपन्यांद्वारे तयार केले जाणार आहे. दरम्यान, मोलनुपिरावीर हे कोरोनावरील अँटीव्हायरल औषध म्हणजेच गोळी आहे.

देशात ओमिक्रॉनची रुग्ण संख्या किती ?

What is the number of Omicron patients in india? देशात ओमिक्रॉन रुग्णांची (Omicron patients) एकूण संख्या ही 653 इतकी झाली आहे. देशात सोमवारी Omicron चे 135 नवीन रुग्ण आढळून आले. ओमिक्रॉनच्या एका दिवसात आढळून येणारी रुग्णांची ही आतापर्यंतही सर्वात मोठी संख्या आहे. सर्वाधिक रुग्ण हे दिल्ली आणि महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्रात 167 आणि दिल्लीत 165 रुग्ण आहेत. यातील काही रुग्ण बरे झाले आहेत.

CORBEVAX COVOVAX Molnupiravir, Union Health Ministry’s big decision: India approves the use of one pill with two new vaccines on corona