Assault on Eknath Khadse daughter Rohini Khadase । एकनाथ खडसेंच्या लेकीवर प्राणघातक हल्ला ; जळगावचे राजकीय वातावरण तापले

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Assault on Eknath Khadse daughter Rohini Khadase | राष्ट्रवादीच्या नेत्या तथा जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड रोहिणी खडसे यांच्या चारचाकी गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करत गाडीची तोडफोड केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवार दि 27 डिसेंबर रोजी रात्रीच्या साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. (Assault on Eknath Khadse daughter Rohini Khadase)

माजी मंत्री एकनाथ खडसे यांची कन्या तथा जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड रोहिणी खडसे – खेवलकर (Eknath Khadse’s daughter Rohini Khadase) ह्या कारमधून प्रवास करत असतानाच मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी कारवर हल्ला करत कारची काच फोडली. या घटनेचे गाडीचे नुकसान झाले आहे. सोमवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मुक्ताईनगर तालुक्यातील माणेगाव ते कोथळी दरम्यान ही घटना घडली. सुदैवाने या प्राणघातक हल्ल्यातून रोहिणी खडसे यांना कोणतीही इजा झाली नाही.

Assault on Eknath Khadse daughter Rohini Khadase

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जिल्हा बॅंकेच्या विद्यामान संचालिका तथा राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे या चांगदेव येथील हळदीचा कार्यक्रम आटोपून मुक्ताईनगरकडे घरी परत येत असताना माणेगाव फाट्यावर अज्ञात मोटरसायकल स्वारांनी त्यांच्या वाहनावर ( एमएच १९/ सी सी १९१९) समोरून हल्ला केला. गाडीवर रॉडने वार केल्याचे सांगितले जात आहे. यात वाहनाच्या दर्शनी काच फुटली आहे. पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले असून अधिक माहिती घेत आहे. दरम्यान, रोहिणी खडसे ज्या बाजूने वाहनात दर्शनी बाजूला बसल्या होत्या, त्याच बाजुचा काच फुटली आहे. सुदैवाने रोहिणी खडसे व ड्रायव्हर या हल्ल्यातून सुखरूप बचावले आहेत. रात्री उशिरा पर्यंत घटनास्थळी तपासकार्य सुरू होते.

राजकीय वादाबाबत चर्चा

दोन दिवसांपासून खडसे तसेच शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात आरोप- प्रत्यारोप सुरु आहेत. याचबरोबर शिवसेना व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनीही एकमेकांवर बदनामी आदी आरोप करीत गुन्हे दाखल केले आहे. एकूणच राजकीय वातावरण मुक्ताईनगर तालुक्यात तापले असताना ही घटना घडली. यामुळे या घटनेला राजकीय किनार तर नाही ना? अशी चर्चाही नागरिकांमध्ये सुरु आहे.

रोहिणी खडसे यांच्या निवासस्थानी समर्थकांची गर्दी

ही घटना घडल्यानंतर रोहिणी खडसे घरी पोहचल्या असता खडसे समर्थकांनी खडसे यांच्या घरी मोठी गर्दी केली होती. स्वत:ला सावरल्यानंतर रोहिणी खडसे यांनी कार्यकर्त्यांची घराबाहेर येऊन भेट घेतली. यावेळी खासदार रक्षा खडसे, दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे व स्वीय सहायक योगेश कोलते हे उपस्थित होते. रोहिणी खडसे यांची मनस्थिती ठिक नसल्याने आज गुन्हा दाखल केलेला नाही, मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास सर्व कार्यकर्त्यांनी जमावे असे आवाहन कोलते यांनी केले.आमचा लढा कोणत्या पक्षा विरुद्ध नसून प्रवृत्तींविरुद्ध आहे तसेच विधानसभेत रडक्या आवाजात सुरक्षा मागणाऱ्यांनी तर अशा भ्याड हल्ल्याचे आदेश दिले नाहीत ना? अशी शंका त्यांनी व्यक्त केली. प्रशासन व सरकार त्यांचे काम करेल, कार्यकर्त्यांनी शांतता पाळावी, असे आवाहन कोलते यांनी केले.

मुंबईला निघालेले खडसे वाटेतूनच माघारी फिरले

दरम्यान राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे हे मुंबईला जात असताना त्यांना रोहिणी खडसे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समजली. खडसे हे नाशिक येथून मुक्ताईनगरकडे रवाना झाले आहेत. उद्या या घटनेसंबंधी एकनाथ खडसे काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.