Aadhaar Card New Rules 2022 । आधार कार्ड संबंधी केंद्र सरकारकडून नवी नियमावली जारी, काय आहेत नवी नियम ? जाणून घ्या

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । Aadhaar Card New Rules 2022 । आपण कोणत्याही ठिकाणी ओळखपत्र जोडायचं म्हटलं की पटकन आधारकार्ड दिलं जातं. आधारकार्डची झेरॉक्स काढून अगदी सहज दिली जाते. ओळखपत्र म्हणून आधार कार्ड न देण्याचं आवाहन केंद्रसरकारने केलं आहे.

केंद्र सरकारने आधार कार्डबाबत (Aadhar Card) एक ॲडव्हायझरी जारी केली आहे. आधारकार्डचा गैरवापर टाळण्यासाठी सरकारने नागरिकांना त्यांच्या आधार कार्डच्या केवळ मास्क प्रतीच अन्य व्यक्तींसोबत शेअर करण्यास सांगितल्या आहेत.

मास्क आधार कार्डवर नंबरचे शेवटचे चार अंकच दिसतात त्यामुळे हे कार्ड सेफ आहे. तुम्ही मास्क आधार कार्ड ऑनलाईन डाऊनलोड करू शकता असंही केंद्र सरकारनं म्हटलं आहे.

तुमच्या आधार कार्डाची फोटोकॉपी कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेसोबत बिनदिक्कतपणे शेअर करू नका. याचा गैरवापर होऊ शकतो,” असं एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सरकारनं सांगितलं आहे.

रविवारी केंद्र सरकारनं आधार कार्डासंबंधी एक ॲडव्हायझरी जारी केली. कोणत्याही विना परवाना खासगी संस्था या हॉटेल्सप्रमाणे आहेत आणि चित्रपटगृहांना आधार कार्डाच्या प्रती एकत्र ठेवण्याची परवानगी नाही, असंही सरकारनं स्पष्ट केलं आहे.

जाहिरात

फक्त ज्या संस्थांनी युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडून वापरकर्ता परवाना प्राप्त केला आहे, तेच एखाद्या व्यक्तीची ओळख स्थापित करण्यासाठी आधार वापरू शकतात,” असं सरकारनं म्हटलं आहे.

सरकारनं नागरिकांना त्यांचे आधार कार्ड शेअर करण्यापूर्वी संस्थेकडे UIDAI कडून वैध वापरकर्ता परवाना असल्याची पडताळणी करण्यास सांगितलं आहे.

याव्यतिरिक्त, सरकारने लोकांना त्यांचे आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी इंटरनेट कॅफेमधील कम्प्युटर्स वापरू नये असा इशारा दिला आहे.

“तुम्ही असं केल्यास, कृपया खात्री करा की तुम्ही त्या सिस्टमवरून ई-आधारच्या सर्व डाउनलोड केलेल्या प्रती कायमस्वरूपी हटवल्या आहेत,” असंही सरकारनं आपल्या अॅडव्हायझरीमध्ये म्हटलंय.