Narmada river ST accident : अपघातातील मृतांची ओळख पटली, नर्मदा नदी एसटी अपघातात महाराष्ट्रातील 5 जणांचा मृत्यू

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर आगाराच्या एसटी बसला आज सकाळी मध्य प्रदेशातील परिसरात भीषण अपघात झाला होता. नर्मदा नदीवरील पुलाचा कठडा तोडून बस नदीत कोसळली होती. या भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला होता. (8 of 13 dead identified in Narmada river ST accident today, 5 from Maharashtra included)

नर्मदा नदीवर घडलेल्या भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला होता यापैकी 8 मृतांची ओळख पटली आहे. मृतांमध्ये महाराष्ट्रातील पाच जणांचा समावेश आहे. यात चालक आणि वाहकाचा समावेश आहे. 

नर्मदा नदी एसटी अपघातातील मृतांची नावे खालील प्रमाणे

  • बस वाहक – प्रकाश श्रवण चौधरी (वय 40, रा. शारदा कॉलनी अमळनेर)
  • चालक – चंद्रकांत  एकनाथ पाटील (वय 45, अमळनेर)
  • चेतन राम गोपाल (जांगिड़, नांगल कला गोविंदगढ़ जयपुर राजस्थान),
  • जगन्नाथ हेमराज जोशी (वय 70, रा. मल्हारगढ़ उदयपुर राजस्थान),
  • निंबाजी आनंदा पाटील (वय 60, पिळोदा अमळनेर),
  • कमलाबाई नीबाजी पाटिल (वय 55, पिळोदा अमळनेर)

वरिल मृतांची ओळख आधारकार्डमुळे पटली आहे.

  • अरवा मुर्तजा बोरा (वय २७, रा. मूर्तिजापुर, अकोला),
  • सैफुद्दीन अब्बास निवासी (नूरानीनगर, इंदौर)

वरिल मृतांची ओळख नातेवाईकांमुळे पटली आहे.