Zika virus । महाराष्ट्रात झिका विषाणूचा शिरकाव, 7-year-old girl infected with Zika virus in Maharashtra

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्रात पावसाने हाहाकार उडवून दिला आहे. राज्यातील अनेक भागात पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढील 48 तासांत राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पावसाने जनतेच्या चिंता वाढवलेल्या असतानाच आता आणखीन एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. (Zika virus in palghar Maharashtra)

महाराष्ट्रात झिका व्हायरसचा पुन्हा शिरकाव झाला आहे. पालघर जिल्ह्यातून ही बातमी समोर आली आहे. पालघरमधील एका सात वर्षीय मुलीला झिका विषाणूची लागण झाली आहे. याबाबतची माहिती आरोग्य विभागाने जारी केली आहे. (Zika virus in palghar, 7-year-old girl infected with Zika virus in Maharashtra)

9 जूलै 2021 रोजी केरळमधील तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील प्रसल्ला या ठिकाणी झिका विषाणूचा देशातील पहिला रुग्ण आढळून आला होता. तसेच महाराष्ट्रात सुध्दा 2021 मध्ये झिका विषाणूचा पहिला रुग्ण पुण्यात आढळून आला होता. त्यानंतर आता 2022 मध्ये पालघर जिल्ह्यात झिका विषाणूचा रुग्ण आढळून आला आहे.

पालघर जिल्ह्यात आढळून आलेला रुग्ण हा झाई आश्रमशाळेतील विद्यार्थीनी आहे. जिचं वय 7 वर्षे आहे. तिच्यावर डाॅक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू करण्यात आले आहेत असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.