मंत्रिमंडळ बैठक निर्णय : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात, शिंदे सरकारचा मोठा निर्णय

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्यात पेट्रोल व डिझेलचे दर प्रतिलीटर शंभर रुपयांच्या वर गेले आहेत. राज्य सरकारने आपल्याला मिळणाऱ्या करातून कपात करावी अशी मागणी होत होती. राज्यात नव्याने स्थापित झालेल्या शिंदे सरकारने पेट्रोल पाच तर डिझेल तीन रुपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता राज्यात पट्रोल आणि डिझेलची वाहने वापरणाऱ्या वाहन धारकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. (Cabinet meeting decision, today big decision of Shinde government regarding reduction of petrol and diesel rates)

मंत्रिमंडळ निर्णय खालील प्रमाणे

वित्त विभाग : पेट्रोल ५ रुपये आणि डिझेल ३ रुपये प्रति लिटर दर कमी करण्याचा निर्णय.

नगर विकास विभाग : राज्यात “स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अभियान” राबविण्यात येणार.

नगर विकास विभाग : केंद्र पुरस्कृत अमृत अभियान २.० (Atal Mission For Rejuvenation & Urban Transformation) राज्यात राबविणार

नगर विकास विभाग : नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवडणूक थेट पद्धतीने घेणार

ग्रामविकास विभाग : राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची ग्रामपंचायतीमधून थेट निवडणूक घेणार. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा.

ग्रामविकास विभाग : अध्यक्ष, उपाध्यक्ष कालावधी तीन महिन्यांपर्यंत वाढविणार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६९ मधील कलम ४३ मध्ये सुधारणा.

पणन विभाग : बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार.महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मध्ये सुधारणा.

सामान्य प्रशासन विभाग: आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला, अशा व्यक्तींचा सन्मान / यथोचित गौरव करण्याची (दिनांक ३१ जुलै, २०२० रोजी बंद करण्यात आलेली ) योजना पुन्हा सुरु करणार