जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक  2022 : प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : अगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम आता वाजले आहे. निवडणूक विभागाने जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठीची मतदार प्रारूप यादी आज 20 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ( Zilla Parishad and Panchayat Samiti Election 2022: Draft Voter List Released)

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक 2022 करीता प्रारूप मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्याअनुषंगाने जामखेड तालुक्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2022 करीता तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्या आज 20 रोजी तहसिल कार्यालय जामखेड व पंचायत समिती कार्यालय जामखेड येथे प्रसिध्द करण्यात आल्या आहेत अशी माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली.

ज्या नागरीकांना मतदार याद्या पहायच्या असतील त्यांना पंचायत समिती कार्यालय जामखेड व तहसिल कार्यालय जामखेड येथे पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. व ज्यांना मतदार यादीबाबत काही तक्रार असेल तर त्यांनी 25 जूलैपर्यंत आपला तक्रार अर्ज तहसिल कार्यालय जामखेड येथे कार्यालयीन वेळेत सादर करावा. 25 जूलै नंतर आलेला तक्रार अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही याची जामखेड तालूक्यातील नागरीकांनी नोंद घ्यावी असे अवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.