Young woman, tortured, two arrested, | हातपाय बांधून तरूणीवर अत्याचार, 02 नराधमांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : एका २० वर्षीय तरूणीच्या घरात घुसून तिच्यावर बळीजबरीने अत्याचार करण्याची धक्कादायक उघडकीस आली आहे.(Young woman, tortured, two arrested,) याप्रकरणात दोघा नराधमांना पोलिसांंनी बेड्या ठोकल्या आहेत.यातील एक आरोपी अहमदनगर जिल्ह्यातील आहे.

याबाबत सविस्तर असे की, आळेफाटा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका गावातून अत्याचाराची ही घटना समोर आली आहे. या घटनेत पीडिता तरूणी घरी एकटीच असल्याची संधी साधून दोघा नराधमांनी तिच्या घरात प्रवेश केला. घरात घुसून अशोक हरिभाऊ बनोटे व त्याचा एक अनोळखी साथीदार याने पीडितेला मारहाण करून कापडाने तिचे हातपाय व तोंड बांधून दोघांनी तिच्यावर आळीपाळीनं अत्याचार (Young woman, tortured, two arrested,) केला. अशी फिर्याद पीडितेच्या आईने दिली आहे. या फिर्यादीवरून दोघा नराधमांविरोधात विविध कलमान्वये आळेफाटा पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान गुन्हे दाखल होताच आळेफाटा पोलिसांनी पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या खळबळजनक घटनेचा वेगाने तपास हाती घेतला. अन अवघ्या काही तासात हरिभाऊ बनोटे (वय- ४५, रा. श्रीरामपूर, जि अहमदनगर)  संदीप भिवसेन सूर्यवंशी (वय- ५० रा. बोरी बुद्रुक ता. जुन्नर जि पुणे) या दोघा नराधमांना पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. दोन्ही नराधमांनी तरूणीवरील अत्याचाराच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. अत्याचाराच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.