Corona eruption in Kharda city | खर्ड्यात कोरोनाचा उद्रेक : कोरोनाने बुधवारी पकडला वेग
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला आहे. रोजची वाढती रूग्ण तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणारी ठरू शकते. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा जामखेड तालुक्यात पुरता बोजवारा उडाला आहे. जामखेड तालुका कोरोनामुक्त झाला आहे या अविर्भात सर्वजण दैनंदिन जीवन जगत आहेत. परंतु कोरोनाचा आकडा रोज वाढत आहे. याचे कुणालाच घेणे देणे नसल्याचे चित्र सबंध तालुकाभर आहे. जो तो आपल्या मस्तीत आहे. बुधवारी जामखेड तालुक्यात कोरोनाची रूग्ण संख्या वाढली आहे.
जामखेड तालुका आरोग्य विभागाने बुधवारी दिवसभरात ५७० नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या केल्या आहेत. यामध्ये घोडेगाव ०१, देवदैठण ०१, साकत ०१, फक्राबाद ०१ व इतर तालुका ०१ असे ०५ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत.
RTPCR अहवालात जामखेड ०६, हळगाव ०२, नान्नज ०२, खुरदैठण ०१, खर्डा १२, भवरवाडी ०१, कुसडगाव ०३, साकत ०१ असे २८ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत.
बुधवारी जामखेड तालुक्यातील खर्ड्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. बुधवारी समोर आलेल्या आकडेवारी सर्वाधिक १२ रूग्ण खर्ड्यात आढळून आले आहेत. दरम्यान आरोग्य विभागाने बुधवारी दिवसभरात एकुण ४५६ नागरिकांचे स्वॅबनमुने कोरोना तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात पाठवले आहेत.
तर बुधवारी दिवसभरात जामखेड तालुक्यात एकुण ३२ नवे कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत.
कोरोनाने सप्टेंबरच्या प्रारंभी पकडलेल्या वेगाकडे दुर्लक्ष केल्यास जामखेड तालुक्यात कोणत्याही क्षणी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला बळी पडू शकतो. नागरिकांनी अजुनही कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा कोरोनाचा विध्वंस अटळ आहे.