World Dog Day 2021 in India | पोलिस दलाच्या  ‘श्वान पथकात’ भारतीय प्रजातीच्या श्वानांचा समावेश करा 

 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा | World Dog Day 2021 in India | महाराष्ट्र राज्याच्या पोलिस दलातील श्वान पथकात भारतीय किंवा स्थानिक प्रजातींच्या श्वानांचा समावेश करावा अशी मागणी पुणे येथील मानवाधिकार कार्यकर्ते  ॲड. विकास शिंदे व ॲड. विंदा महाजन यांनी महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक आणि पुणे पोलिस आयुक्तांकडे आज निवेदनाद्वारे केली.

Pune-based human rights activists Adv. Vikas Shinde and Adv. Vinda Mahajan today addressed a statement to the Director General of Police of Maharashtra and the Commissioner of Police of Pune & He demanded that dogs of Indian or local breeds should be included in the dog squad of Maharashtra State Police.

World Dog Day 2021 in India |आज ‘जागतिक श्वान दिवस’ आहे. (World Dog Day) आजच्या दिवसाचे औचित्य साधून राज्यातील पोलिस पथकातील श्वानांच्या कर्तबगारी व हुशारीबद्दल प्रचंड कौतुक होतंय. परंतु महाराष्ट्र राज्यातील पोलिस दलातील एकाही श्वान पथकात भारतीय प्रजाती किंवा स्थानिक प्रजातींचे श्वान समाविष्ट नाहीत ही आजच्या दिवसाची खेदजनक बाब आहे.

मागच्याच वर्षी देशाच्या पंतप्रधानांनी देशातील तपास यंत्रणांनी यापुढे श्वान पथकांसाठी भारतीय प्रजाती किंवा स्थानिक श्वानांचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या सुचना ‘मन की बात’ द्वारे केलेल्या आहेत.

World Dog Day 2021 in India | भारतीय प्रजातीच्या श्वानांच्या कर्तबगारीचे दाखले इतिहासात ठिकठिकाणी मिळतात. भारतीय प्रजातीच्या श्वानांची चपळाई आणि हुशारी लक्षात घेऊन तामिळनाडू पोलिस, मध्यप्रदेश पोलिस, उत्तराखंड पोलिसांनी त्यांच्या राज्यात तसेच भारतीय लष्कर व निमलष्करी दलातील श्वान पथकातही भारतीय प्रजातीच्या श्वानांचा समावेश केला आहे. त्याच बरोबर स्थानिक श्वानांचा या पथकांमध्ये समावेश केल्यास विदेशी श्वानांच्या तुलनेत त्यांचे आजारी पडण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे तसेच त्यांना सांभाळण्यासाठी येणारा खर्चही कमी आहे.

World Dog Day 2021 in India | वरील सर्व बाबींचा विचार करुन व आजच्या दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्यातील पोलिस दलातील श्वान पथकात भारतीय किंवा स्थानिक प्रजातींच्या श्वानांचा समावेश करावा अशा आशयाचे निवेदन ॲड. विकास शिंदे व ॲड. विंदा महाजन यांनी  महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक आणि पुणे पोलिस आयुक्तांना आज  दिले आहे.