- Advertisement -

Kharda Police Station Sanctioned by the Maharashtra government | रोहित पवारांची जादू : खर्डा पोलीस स्टेशनला मंजुरी !

असे असेल खर्डा पोलिस स्टेशनचे नवे मनुष्यबळ

जामखेड टाईम्स वृत्तसेवा | Kharda Police Station Sanctioned by the Maharashtra government | जामखेड तालुक्यातील खर्डा येथे नवीन पोलिस स्टेशन मंजूर व्हावे अशी मागणी गेल्या वर्षांपासून या भागातील जनतेतून होत होती.अखेर ही मागणी फळाला आली आहे.राज्याच्या गृहविभागाने खर्डा पोलिस स्टेशनला मंजुरी दिली आहे. त्यासाठी आवश्यक मनुष्य बळही उपलब्ध करून दिले आहे. या संबंधीचा शासन निर्णय महाराष्ट्र सरकारने गुरुवारी (ता 26 रोजी ) जारी केला. आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला यानिमित्ताने मोठे यश मिळाले आहे.

Kharda Police Station Sanctioned by the Maharashtra government | राज्याचे पोलीस महासंचालक यांनी अहमदनगर पोलिस अधिक्षक यांच्या अस्थापनेवरिल कर्जत पोलीस ठाण्याचे विभाजन होवून मिरजगाव पोलीस ठाणे निर्माण करण्याचा व जामखेड पोलीस ठाण्याचे विभाजन होवून खर्डा पोलीस ठाणे निर्माण करण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी सादर केला होता त्यानुषंगाने शासनाने खर्डा व मिरजगांव पोलीस ठाणे निर्माण करण्यास मान्यता दिली आहे.

अनेक वर्षांची मागणी आली फळाला

जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरात गुन्हेगारी घटना मोठ्या प्रमाणावर घडतात. मराठवाड्याचे प्रवेश असल्याने या भागातील गुन्हेगारांचा खर्डा व परिसरात सतत आश्रय असतो. त्याचबरोबर या भागात अवैध्य धंद्यांना नेहमीच ऊत आलेला असतो.  या भागात मोठी घटना घडल्यास जामखेड पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यास लांबच्या अंतरामुळे उशिर होणे हे ठरलेले असायचे.

Kharda Police Station Sanctioned by the Maharashtra government
खर्डा पोलीस दूरक्षेत्र

या सर्व बाबी पाहता खर्डा पोलिस दुरक्षेत्राचे रूपांतर खर्डा पोलिस ठाण्यात झाल्यास या भागात कायम अधिकारी व कर्मचारी वर्ग राहतील त्यामुळे या भागातील  गुन्हेगारांवर मोठा वचक बसु शकतो. त्या अनुषंगाने खर्डा पोलिस स्टेशन निर्मितीची मागणी सातत्याने राजकीय व्यासपीठावर व्हायची. गेली अनेक वर्षे हा मुद्दा निवडणुकीत नेहमी गाजत असायचा. (Kharda Police Station Sanctioned by the Maharashtra government)

आमदार रोहित पवार यांनी खर्डा भागाची गरज लक्षात घेता खर्डा पोलिस स्टेशन निर्मितीसाठी पुढाकार तर घेतलाच परंतु सातत्याने आवश्यक त्या बाबींची पूर्तता करण्यासाठी पाठपुरावा केला.गृहखाते राष्ट्रवादीकडे असल्याने खर्डा व मिरजगांव पोलिस ठाणे निर्मितीच्या कामांना वेग आला आणि अखेर गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रतिक्षा गुरूवारी संपली. खर्डा व मिरजगांव पोलिस स्टेशन मंजूर झाल्याने मतदारसंघातील जनतेत आनंदाचे वातावरण पसरले आहे. (Kharda Police Station Sanctioned by the Maharashtra government)

असे असेल खर्डा पोलिस स्टेशनचे नवे मनुष्यबळ

  •  सहायक पोलीस निरीक्षक ०१
  • पोलिस उपनिरीक्षक ०१
  • सहायक पोलीस उपनिरीक्षक ०३
  • हेड कॉन्स्टेबल ०६
  • पोलिस नाईक ०९
  • पोलिस शिपाई १५

असे एकुण ३५ जणांचा स्टाफ असणार आहे. शासनाने त्यास मंजुरी दिली आहे.

शासन निर्णय खालील प्रमाणे (Kharda Police Station Sanctioned by the Maharashtra government)

1) खर्डा व मिरजगांव पोलीस ठाणे निर्माण करण्यास मंजुरी देण्यात येत आहे.

2) नवनिर्मित खर्डा व मिरजगांव पोलीस स्टेशनकरिता सदर शासन निर्णयासोबतच्या “परिशिष्ट अ” मध्ये नमूद केलेली विविध संवर्गातील एकुण ७० पदे पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांचे आस्थापनेवरील उपलब्ध मनुष्यबळातून उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे.

3) नवनिर्मित खर्डा व मिरजगांव पोलीस स्टेशनकरिता येणारा आवर्ती खर्च व अनावर्ती खर्च पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांचे कार्यालयाकरिता मंजूर असलेल्या अनुदानातून भागविण्यात यावा.

४. हद्दनिश्चितीबाबतचा प्रस्ताव पोलीस महासंचालकांनी शासनास तात्काळ सादर करावा.

५. सदरहू शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारीक संदर्भ क्र. ४७६ / २०२१ / व्यय – ७, दिनांक ०८.०७.२०२१ अन्वये दिलेल्या मान्यतेनुसार व वित्त विभाग क्रमांक.संकीर्ण-२०१५/प्र.क्र.४१/अर्थ-१, दि.०२.०६.२०१५ अन्वये विभागप्रमुखास प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२१०८२६१५२३५६९५२९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.गृहविभागाचे सहसचिव कैलास गायकवाड यांची स्वाक्षरी असलेला हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

 

web title – Kharda Police Station Sanctioned by the Maharashtra government