जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जागतिक तायक्वांदो दिनानिमित्त अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनच्या जामखेड तालुक्यातील जमादारवाडी येथील श्री संत वामनभाऊ गड परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशन ही संस्था गेल्या २८ वर्षापासून जिल्ह्यात काम करते. संस्थेने आजवर अनेक गुणवंत खेळाडू घडविले आहेत. संस्थेच्या खेळाडू व पदाधिकाऱ्यांनी वृक्षारोपण करत जागतिक तायक्वांदो दिन साजरा केला.राहुरी येथील तायक्वांदो प्रशिक्षक बाबासाहेब क्षीरसागर यांनी राहुरी विद्यापीठातून दुर्मिळ झाडांची रोपे या उपक्रमासाठी उपलब्ध करून दिली तर काही रोपे संत वामनभाऊ महाराज मंदिर समितीच्या वतीने उपलब्ध करण्यात आली.
यावेळी अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. एकनाथ मुंडे जिल्हा सचिव संतोष बारगजे,संजय बेरड, अजित गोरड, श्री संत वामनभाऊ महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक दादासाहेब महाराज सातपुते, कैलास नेटके, दादासाहेब शिंदे रघुनाथ शेळके, अशोक आजबे व खेळाडू उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते यानिमित्ताने गुणवंत खेळाडूंना बेल्ट प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.