…अखेर आशा सेविकेंचा संप मिटला; सरकारने केल्या “या” मागण्या मान्य !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : राज्यातील आशा सेविकेंचा सुरू असलेला संप आज मिटला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आशा सेविकेंच्या संपाबाबत कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत मानधन वाढ व कोविड भत्त्यांमध्ये वाढ मान्य झाल्याने  संप मागे घेत असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीनंतर जाहीर केले. (The ongoing strike of Asha workers in the state has ended today. Health Minister Rajesh Tope called a meeting of the office bearers of the action committee regarding the strike of Asha workers. After the meeting, the office bearers of the committee announced that they were withdrawing the strike as they had agreed to increase the honorarium and increase the allowance.)

कागदोपत्री कोरोनायोद्धा म्हणण्यापेक्षा आमच्या मागण्या मान्य करा असे म्हणत राज्यातील आशा सेविका मागील आठवडाभरापासून संपावर गेल्या होत्या. राज्यातील प्रत्येक तालुक्यात त्यांनी निवेदने दिली होती. तसेच आमदार खासदारानांही आपल्या मागणीचे निवेदन दिली होती. मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा देखील  देण्यात आला होता.

ऐन कोरोना महामारीच्या काळात आशा वर्कर्सनी पुकारलेल्या संपामुळे रुग्णांचे हाल होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. मात्र आशा सेविका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आरोग्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत तोडगा निघाल्याने संप मागे घेण्यात आला आहे.

“राज्यातील 72 हजारांहून अधिक आशा सेविका कामावर न जाता घरी बसून संप करत होत्या. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या सोबत झालेल्या बैठकीतील तोडग्यानुसार आशा सेविकांना 01 जुलै 2021 पासून 1000 रुपये निश्चित मानधन वाढ आणि 500 रुपये कोविड भत्ता देण्याचा निर्णय झाला.” (More than 72,000 Asha workers in the state were on strike at home without going to work. As per the agreement reached in the meeting with Health Minister Rajesh Tope, it was decided to give a fixed honorarium increase of Rs. 1000 and it was decided to Rs 500 give Kovid allowance.

राज्यभरातील आशा वर्कर्सनी पुकारलेल्या संपावर तोडगा काढण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून आशा वर्कर्स संघटनेचे पदाधिकारी आणि आरोग्यमंत्र्यांमध्ये चर्चा सुरु होत्या. आशा वर्कर्सचा संप पुकारल्यापासून आशा वर्कर्स संघटनेचे पदाधिकारी आणि आरोग्यमंत्र्यांमध्ये तीन बैठका झाल्या. अखेर एक जुलैपासून निश्चित मानधनात वाढ करुन एक हजार रुपये केलं जाणार असल्याची हमी आशा वर्कर्सना देण्यात आल्यामुळे त्यांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.