Palak Mantri List Maharashtra 2025 : मुंबई, ठाणे,पुणे, बीड, सातारा, नाशिक, कोल्हापुर,नागपुर व नगरच्या पालकमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार? वाचा महाराष्ट्रातील संभाव्य पालकमंत्र्यांची यादी
Palak mantri list maharashtra 2025 : राज्यात प्रचंड बहुमताने महायुतीचे सरकार सत्तेवर आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnvis cm) यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाचा (mantri mandal) शपथविधी पार पडल्यानंतर पालकमंत्री पदासाठी (palak mantri) मोठी रस्सीखेच झाल्याचे पाहायला मिळत आहेत. अनेक मंत्र्यांनी पालकमंत्रीपदासाठी (Guardian Ministers list Maharashtra) एकाच जिल्ह्यावर दावा ठोकला आहे. यामुळे पालकमंत्री पदाबाबत महायुतीच्या (mahayuti) घटक पक्षांत अजूनही एकमत झालेले नाही, परंतू ही चर्चा अंतिम टप्पात आहे. या घडामोडी घडत असतानाच महाराष्ट्रातील पालकमंत्र्यांची संभाव्य यादी समोर आली आहे. (Palak mantri yadi 2025 maharashtra)

राज्यात सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचे मंत्रिमंडळ निर्माण होत असताना मंत्रीपदासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांतील नेत्यांमध्ये मोठी रस्सीखेच झाल्याचे दिसून आले होते. मंत्रीपदाची संधी देताना जागा कमी आणि त्यासाठी इच्छुक जास्त अशी स्थिती असल्याने अनेकांच्या स्वप्नांवर पाणी फिरले. यामुळे महायुतीत काही काळ नाराजी नाट्य रंगले होते.नाराज आमदार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी नाराजी बोलून दाखवली होती.पण हे नाराजी नाट्याचे वादळ पेल्यातच शमले.मंत्रीमंडळ निर्माण झाल्यानंतर कोणत्या मंत्र्यांकडे कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद जाणार याचीच उत्सुकता शिगेला पोहचलेली आहे. (Palak mantri 2025)
अमूक जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून आपलीच नेमणूक व्हावी यासाठी मंत्र्यांकडून जोरदार लाॅबिंग सुरु आहे. एकाच जिल्ह्यात जास्त मंत्री असल्याने त्यांनी एकाच ठिकाणी दावा ठोकला. त्यामुळे तेथे कोणाची वर्णी लावायची याचा पेच अडकला आहे. दरम्यान सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सुटणार आहे.याबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आहे.लवकरच राज्यातील जिल्हानिहाय पालकमंत्री यादी घोषित केली जाऊ शकते. परंतू त्या आधी संभाव्य पालकमंत्र्यांची यादी समोर आली आहे. (Palak Mantri 2025 maharashtra)
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे, महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे नागपूरचे पालकमंत्रीपद जाऊ शकते. दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीडचे पालकमंत्रीपद जाऊ शकते. संभाव्य यादीत पंकजाताई मुंडे यांचा समावेश नाही. परंतू ऐनवेळी त्यांची वर्णी लागु शकते अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. (palak mantri list maharashtra)
महाराष्ट्र पालकमंत्री यादी 2025
- गडचिरोली पालकमंत्री – देवेंद्र फडणवीस
- नागपूर पालकमंत्री – चंद्रशेखर बावनकुळे
- ठाणे पालकमंत्री – एकनाथ शिंदे
- पुणे पालकमंत्री – अजित पवार
- बीड पालकमंत्री – अजित पवार
- सिंधुदुर्ग पालकमंत्री – नितेश राणे
- अमरावती पालकमंत्री – चंद्रशेखर बावनकुळे
- अहिल्यानगर पालकमंत्री – राधाकृष्ण विखे पाटील
- वाशिम पालकमंत्री – हसन मुश्रीफ
- सांगली पालकमंत्री – चंद्रकांत पाटील
- सातारा पालकमंत्री -शंभुराजे देसाई
- छत्रपती संभाजी नगर पालकमंत्री – संजय शिरसाट
- जळगाव पालकमंत्री – गुलाबराव पाटील
- यवतमाळ पालकमंत्री – संजय राठोड
- कोल्हापूर पालकमंत्री – प्रकाश आबिटकर,
- अकोला पालकमंत्री – आकाश फुंडकर
- भंडारा पालकमंत्री – संजय सावकारे
- बुलढाणा पालकमंत्री – मंकरंद जाधव
- चंद्रपूर पालकमंत्रि – अशोक ऊईके
- धाराशीव पालकमंत्री – प्रताप सरनाईक
- धुळे पालकमंत्री – जयकुमार रावल
- गोंदिया पालकमंत्री – बाबासाहेब पाटील
- हिंगोली पालकमंत्री – नरहरी झिरवळ
- लातूर पालकमंत्री – शिवेंद्रसिंग भोसले
- मुंबई शहर पालकमंत्री – एकनाथ शिंदे
- नांदेड पालकमंत्री – अतुल सावे
- नंदुरबार पालकमंत्री – माणिकराव कोकाटे
- नाशिक पालकमंत्री – गिरीश महाजन
- पालघर पालकमंत्री – गणेश नाईक
- परभणी पालकमंत्री – मेघना बोर्डीकर
- रायगड पालकमंत्री – अदिती तटकरे
- रत्नागिरी पालकमंत्री – उदय सामंत
- सिंधुदुर्ग पालकमंत्री – नितेश राणे
- सोलापूर पालकमंत्री- जयकुमार गोरे
- वर्धा पालकमंत्री – पंकज भोयर
- जालना पालकमंत्री – पंकजा मुंडे
सह पालकमंत्री 2025
गडचिरोली सह पालकमंत्री – आशिष जयस्वाल
मुंबई उपनगर सह पालकमंत्री – मंगलप्रभात लोढा
कोल्हापूर सह पालकमंत्री – माधुरी मिसाळ