मोठी बातमी : अखेर साई संस्थानचे अध्यक्षपद गेले राष्ट्रवादीच्या वाट्याला; या नेत्याची लागली अध्यक्षपदी वर्णी

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : कोट्यावधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या शिर्डी व पंढरपूर येथील देवस्थानच्या अध्यक्षपदाचा तिढा आज मुंबईत .सुटला.महाविकास आघाडी सरकारच्या समन्वय समितीच्या बैठकीत यावर तोडगा काढण्यात महाविकास आघाडीला यश आले. आता शिर्डीच्या साईबाबा संस्थानवर राष्ट्रवादीचा तर पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी देवस्थानवर काँग्रेसचा अध्यक्ष असणार आहे. (Finally, the chairmanship of Sai Sansthan went to the NCP2021)

शिर्डीच्या साईबाबा संस्थान (Shirdi Sai Sansthan) व पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी देवस्थानच्या अध्यक्षपदासह (Pandharpur Vittal Rukhmini Devasthan)  विश्वस्तपदी कुणाची वर्णी लागणार याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. यासाठी अनेक बड्या नेत्यांनी मोर्चेबांधणी हाती घेतली होती परंतु कोणत्या पक्षाकडे कोणत्या देवस्थानचे अध्यक्षपद यावरचा तिढा मात्र कायम होता. शिर्डी साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदावर काँग्रेस (Congress Party) व राष्ट्रवादी (NCP) या दोन्ही पक्षांनी दावा केला होता. यामुळे तिढा वाढला होता मात्र महाविकास आघाडी सरकारच्या आज मुंबईत पार पडलेल्या समन्वय समितीच्या बैठकीत यावर तोडगा काढण्यात आला आहे.त्यानुसार शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद राष्ट्रवादीला तर पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे अध्यक्षपद काँग्रेसच्या पारड्यात गेले आहे.

कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डीतील साईबाबा आणि पंढऱपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थानच्या विश्वस्तपदावर वर्णी लागण्यासाठी राजकीय मंडळींकडून फिल्डिंग लावण्यात येत होती. अखेर आज या संस्थानचे विश्वस्तपद, अध्यक्षपदाच्या संदर्भात निर्णय झाला आहे. या बैठकीत तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीत महामंडळ नियुक्त्या आणि साई संस्थान, पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी संस्थान विश्वस्तपदाबाबत निर्णय घेण्यात आला आहे. महामंडळांच्या नियुक्त्या 15 दिवसांत जाहीर करण्यात येणार आहेत. तिन्ही पक्षांना समसमाना वाटप आणि अपक्षांनाही हिस्सा देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

आ.काळेंच्या पारड्यात साई संस्थानचे अध्यक्षपद

आमदार आशुतोष काळे हे शिर्डी साई संस्थानचे नवे अध्यक्ष असणार आहेत. साई संस्थानचा कारभार सध्या न्यायाधीशांकडे होता. संस्थानवर स्थानिकांना संधी द्यावी, अशी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार स्थानिक अध्यक्ष देण्यात आल्याचे समजते. शिर्डी संस्थानवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच अध्यक्ष होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार आमदार काळे यांची निवड अपेक्षित मानली जात आहे.अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार, पारनेरचे आमदार नीलेश लंके यांच्या नावाचीही चर्चा होती. काँग्रेसचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाचीही मागणी होत होती. आमदार काळे हे शेवगावचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचे जावई आहेत. घुले हे जयंत पाटील यांचे मेहुणे आहेत. काळे यांंचे कुटुंब साई संस्थानसोबत पूर्वीपासून निगडित आहे. आमदार काळे यांची निवड अपेक्षित मानली जात होती. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात त्यांच्या नावाची चर्चा होती.