Swachh Bharat Mission Gramin SBM-G : अहमदनगर जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन ग्रामीणचा दुसरा टप्पा पुन्हा सुरु, वैयक्तिक शौचालय योजनेचा लाभ घ्यावा- मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात स्वच्छ भारत मिशन ग्रामीणचा दुसरा टप्पा पुन्हा सुरु झाला आहे.(Swachh Bharat Mission Gramin Phase 2) शौचालय (Toilet) लाभापासून कोणीही पात्र कुटूंब वंचित राहु नये, यासाठी पात्र लाभार्थ्यांना (Beneficiary) ग्रामपंचायतीकडे (Gram Panchayat) अर्ज करण्याची पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. कुटूंब प्रमुखांनी (Head of family) आपल्या ग्रामपंचायतीकडे अर्ज सादर करावा, असे आवाहन अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे. (Ahmednagar Zilla Parishad Chief Executive Officer Ashish Yerekar)
ग्रामीण भागातील शौचालय अभावी उघड्यावर शौचास गेल्याने सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होतो. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत शौचालय बांधकाम करणा-या पात्र कुटूंबांस 12 हजार रूपयांचा प्रोत्साहन पर अनुदानाचा लाभ दिला जातो. अशा कुटूंबांसाठी शासनाने पुन्हा एकदा संधी उपलब्ध करुन दिली आहे. शासनाच्या निकषानुसार म्हणजेच शौचालय नसलेल्या लाभार्थ्यांपैकी अन्य कुठल्याही योजनेतुन शौचालयासाठी लाभ न घेतलेले कुटूंब प्रमुख यासाठी पात्र ठरु शकतील.
कोणाला मिळणार शौचालय अनुदान ?
अल्पभूधारक, भूमिहीन, महिला कुटूंब प्रमुख, अुनसूचित जाती –जमाती, दिव्यांग कुटूंब प्रमुख, दारिद्रय रेषेखालील कुटूंब असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र आधार कार्ड झेरॉक्स, रेशन कार्ड झेरॉक्स, लाभार्थ्याचे राष्ट्रीकृत उघडलेल्या खात्याची प्रत, ही आवश्यक कागदपत्रासह परिपुर्ण प्रस्ताव ग्रामपंचायतीकडे सादर करावा.
लाभार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन खालील प्रमाणे करावे
तसेच वैयक्तिक शौचालय बांधकाम पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांनी मोबाईल, कॉम्प्युटर, सायबर कॅफे अथवा इतर ऑनलाईन सेवेद्वारे SBM-G या संकेतस्थळावरुन अथवा http://sbm.gov.in/sbmphase2/homenew.aspx या लिंकद्वारे Citizen corner किंवा Whats new या ठिकाणी जाऊन रजिस्ट्रेशन (sbm-g registration) करावयाचे आहे. केलेल्या नोंदणीची तपासणी करुन पात्र लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालयाच्या अनुदानाचा लाभ मिळणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील बांधकाम करावायचे शिल्लक असलेले लाभार्थी यांनी प्रोत्साहन अनुदानाकरीता या ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमांतून आपली नाव नोंदणी करावी. तसेच याबाबच्या अधिक माहितीकरीता आपली ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत, पंचायत समिती स्तरावर गट संसाधन केंद्र पाणी व स्वच्छता यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन जामखेडचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी केले आहे. (BDO Prakash Pol)