Agricultural Mortgage Loan Scheme : जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर, जामखेड बाजार समिती राबवणार शेतमाल तारण कर्ज योजना – सभापती शरद कार्ले यांची घोषणा !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड बाजार समितीवर (Jamkhed Market committee) सत्ता स्थापन केल्यानंतर आमदार प्रा.राम शिंदे (MLA Ram Shinde BJP) यांच्या मार्गदर्शनाखाली सभापती शरद (दादा) कार्ले (Sharad karle) यांनी शेतकरी हिताचे विविध उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शेतमाल तारण कर्ज योजना (Agricultural Mortgage Loan Scheme) सुरु करण्याचा मोठा निर्णय जामखेड बाजार समितीने शनिवारी घेतला आहे. या निर्णयामुळे तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

good news for farmers, Agriculture mortgage loan scheme will be implemented in Jamkhed Market Committee - Chairman Sharad Karle, Agricultural insurance, Maharashtra State Board of Agricultural Marketing

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ (Maharashtra State Board of Agricultural Marketing) आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेली ‘शेतमाल तारण कर्ज योजना’ (shetmal Taran Yojana) जामखेड बाजार समितीच्या माध्यमांतून मोठ्या ताकदीने राबवण्याचा निर्णय जामखेड बाजार समितीने घेतला आहे. बाजार समितीचे सभापती शरद कार्ले यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

शेतमालाचे वारंवार कमी होणारे बाजारभाव त्यामुळे शेतकऱ्यांचं होणारं नुकसान टाळण्यासाठी जामखेड बाजार समितीत शेतमाल तारण कर्ज योजना (Agricultural Mortgage Loan Scheme) सुरु करण्यात आली आहे. या योजनेमुळे शेतमालाचे बाजार भाव जेव्हा कमी असतात तेव्हा शेतकऱ्यांनी आपला शेतमाल वखार महामंडळाच्या गोदामामध्ये ठेवण्याची सुविधा या योजनेमध्ये आहे.

ज्या शेतकऱ्यांना शेतमाल तारण योजनेतून कर्ज हवे आहे त्यांनी वखार महामंडळाच्या (Wakhar Corporation) गोदामात साठवणूक केलेल्या शेतमालाची पावती बाजार समितीकडे सादर करावी, त्यानंतर बाजार समिती पणन मंडळाच्या कर्ज पुरवठ्याची प्रक्रीया पुर्ण करेल.या माध्यमांतून शेतकऱ्यांना शेतमालाच्या एकुण किमतीच्या 70 टक्के कर्ज मंजुर होईल, यासाठी 6% इतका व्याजदर असणार आहे. कर्जफेडीची मुदत सहा महिने असणार आहे. व्यापाऱ्यांचा शेतमाल या योजने अंतर्गत स्विकारला जाणार नाही.

वखार महामंडळाच्या (Wakhar Mahamandal Godam) गोदामामध्ये ठेवलेल्या शेतमालाला एक महीन्यासाठी प्रती 50 किलोसाठी 8 रू एवढे भाडे वखार महामंडळाने निर्धारीत करून दिले आहे, परंतू वखार महामंडळाच्या गोदामामध्ये ठेवलेल्या शेतमालाचे भाडे व इतर खर्च हा शेतकऱ्यांकडून न घेता हा खर्च जामखेड बाजार समिती करणार आहे, त्यामुळे जामखेड तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

वखार महामंडळाच्या गोदामामध्ये ठेवलेला संपुर्ण शेतमाल हा विमा (Agricultural insurance) संरक्षित असेल आणि शेतमालाला कीड लागणार नाही याची काळजी वखार महामंडळाकडुनच घेतली जाईल, शेतकरी बांधवांचे हित लक्षात घेऊन जामखेड बाजार समितीने हाती घेतलेल्या शेतमाल तारण योजनेचे जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांमधून स्वागत होत आहे.

जामखेड तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी शेतमाल तारण योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा शेतमाल काढणीच्या ऐनवेळी आवक वाढल्यानंतर कमी होणाऱ्या बाजारभावापासुन आपलं नुकसान टाळावं असे आवाहन जामखेड बाजार समितीचे सभापती शरद(दादा) कार्ले यांनी केले आहे.