stock market Investing vishal fate Scam | शेअर मार्केटमधील गुंतवणुकीचा स्कॅम : 200 कोटींचा गंडा घालून बार्शीचा विशाल फटे झाला फरार

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । शेअर बाजारात गुंतवणूक (Stock Market Investing Vishal Fate Scam) करा तीन महिन्यात दामदुप्पट रक्कम मिळवा असे आमिष दाखवून सुमारे 200 कोटींचा चुना लावण्याचे एक प्रकरण बार्शीतून समोर आले आहे. या प्रकरणात सामान्यांसह राजकारणी, डाॅक्टर, शिक्षक सह आदींची फसवणुक झाली आहे. (escaped by cheating Rs 200 crore vishal fate Barshi)

तीन महिन्यांत दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवून विशाल फटे या तरूणाने बार्शीकरांना किमान 200 कोटी रुपयांचा गंडा घातलाय. या प्रकरणात सोलापुर जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल होताच एसआयटीची (विशेष तपास पथक) करण्यात आली आहे. (Stock Market Investing Vishal Fate Scam)

‘शेअरबाजारात पैसे गुंतवा आणि तीन महिन्यात दुप्पट करून देतो’, असे आमिष विशाल फटे याने अनेकांना दाखविले. शेअर ब्रोकर असलेल्या विशालने दोन वर्षांपूर्वी बार्शीत अलका शेअर्स सर्व्हीस, विशालका कन्सलंट, पह्ग्स ट्रेडिंग कंपनी या तीन कंपन्या सुरू केल्या होत्या. याच कंपन्यांच्या माध्यमांतून तो सर्व आर्थिक व्यवहार घडवून आणायचा. विविध योजनेतून तो आमिष दाखवायचा. (Stock Market Investing Vishal Fate Scam)

विशाल फटे विरूध्द 60 तक्रारी दाखल

बार्शी आणि परिसरातील बडे व्यापारी, डॉक्टर्स, राजकीय नेते हे त्याच्या जाळय़ात फसल्याचे दोन दिवसांपूर्वी उघड झाले. तब्बल 200 कोटी रुपयांचा घोटाळा करून विशाल, त्याची पत्नी राधिका फटे आणि दीड वर्षांच्या मुलीसह फरार झाला आहे. आतापर्यंत त्याच्याविरोधात फसवणुकीच्या 60 पेक्षा जास्त तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. (Stock Market Investing Vishal Fate Scam)

तपासासाठी एसआयटी स्थापन

विशालच्या शोधाकरिता 8 पोलीस पथक रवाना करण्यात आले आहेत. या तपासाकरिता एसआयटी स्थापन करण्यात आली असून, ज्याची फसवणूक झाली आहे त्यांनी तक्रार देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन बार्शीचे पोलीस निरीक्षक शेळके यांनी केले आहे.

विशालला पाब्लो एस्कोबार बनायचे होते

बार्शीकरांना ठगविणारा विशाल फटे याचा गुन्हेगारी जगातील कुख्यात पाब्लो एमिलियो एस्कोबार (Pablo Escobar) व्हायचे होते. एस्कोबार हा अवैध धंद्यातून पुढे आलेला ठग गुन्हेगारी जगतातील मास्टर माईंड होता. हा फटे पाब्लोचा आदर्श घेऊन वाटचाल करायचा मनसुबा मित्रामध्ये बोलून दाखवायचा. ही घटना उघडकीस आल्यानंतर फटेची तुलना पाब्लोबरोबर करण्यात येत आहे.

200 कोटी च्या फसवणूक प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी विशाल फाटेच्या वडिलांसह भावाला अटक करण्यात आली आहे. विशाल बायको मुलांचा फरार झाला आहे. त्याच्या शोधासाठी 8 पोलिस पथके मागावर आहेत. (Stock Market Investing Vishal Fate Scam)

विशाल फटे हा मुळचा मंगळवेढा तालुक्यातील आहे. त्याचे वडील बार्शीतील एका महाविद्यालयात प्राध्यापक होते. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून ते बार्शीतच वास्तव्यास होते. बार्शीतील शिवाजी महाविद्यालयासमोर साई नेट कॅफे नावाने तो नेट कॅफे चालवत होता.

इथूनच तो छोट्या प्रमाणात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक देखील करत होता. 2019 साली फिर्यादी दीपक आंबरे हे विशाल याच्या नेट कॅफेमध्ये पीक विम्याचे फॉर्म भरण्यासाठी गेले होते. तिथे त्यांची ओळख विशाल सोबत झाली. नंतर ही मैत्री अधिक घट्ट होत गेली.

विशालने दीपक यांना शेअर मार्केटबद्दल सांगितले. आणि त्यांच्याकडून पहिल्यांदा 70 हजार रुपये घेतले. पहिल्याच महिन्यात 30 हजार रुपये वाढ करुन एक लाख रुपयांचा परतावा विशालने दीपक यांना दिला. यामुळे त्यांचा विश्वास वाढत गेला. दीपक यांनी स्वत: सह आपल्या परिवारातील सदस्यांचे, नातेवाईकांचे पैसे देखील विशालकडे गुंतवले.

जवळपास 5 कोटी रुपयांची गुंतवणूक फिर्यादी दीपक यांनी विशालकडे केली होती. दीपक प्रमाणेच बार्शीतील अनेकांनी विशालकडे पैसे गुंतवलेले होते. मात्र 9 जानेवारी रोजी विशाल आपल्या परिवारासह पसार झाला आहे. त्याच्या शोधासाठी सोलापूर ग्रामीण दलाचे तीन ते चार पथक विविध ठिकाणी रवाना करण्यात आले आहे.

आरोपी विशालचे कार्यालय, घर सील, बॅंकेतील अकाऊंटही गोठवले

विशाल फटे विरुद्ध गुन्हा नोंद होताच पोलिसांनी उपळाई रोडवर असलेल्या त्याच्या कार्य़ालयाची आणि बार्शीतील घराची झडती घेतली. झडतीमध्ये पोलिसांनी विविध कागदपत्रे, चेकबुक जप्त केल्याची माहिती आहे. सोबतच विशालचे कार्य़ालय आणि घर देखील पोलिसांनी आता सील आहे. त्याचप्रमाणे पोलिसांनी विविध बँकेतील त्याची खाती पत्र देऊन गोठवण्यात आली आहे. (Stock Market Investing Vishal Fate Scam)