जामखेड : राष्ट्रवादीच्या सुरेश भोसलेंमुळे मी भाजपसोबत – सामाजिक कार्यकर्ते प्रा सचिन गायवळ यांचा गौप्यस्फोट

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादीच्या आमदारांनी राष्ट्रवादीच्या एकाही कट्टर कार्यकर्त्यांला उमेदवारी दिली नाही.कार्यकर्त्यांचा नुसता वापरच होणार असेल तर त्या पक्षासोबत जाण्यात काय अर्थ आहे, कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला धडा शिकवण्यासाठी सज्ज रहावे,असे म्हणत बँकेच्या माध्यमांतून राळेभात बंधूची जी दडपशाही सुरु आहे ती मोडीत काढण्यासाठी स्वाभिमानी जामखेडकरांनी एकजूट दाखवून आमदार प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलला मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे अवाहन सामाजिक कार्यकर्ते प्रा सचिन गायवळ यांनी केले.

Social activist Sachin Gaiwal secret blast, jamkhed market committee election 2023, I  went with BJP because of NCP's Suresh Bhosle,

जामखेड बाजार समिती निवडणूकीचा प्रचार आता चांगलाच तापला आहे.आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलचे सर्व उमेदवारांनी तालुका पिंजून काढत मतदारांशी जवळीक वाढवली आहे. स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांनी मंगळवारी रात्री सोनेगावला भेट दिली. यावेळी झालेल्या प्रचार सभेत सामाजिक कार्यकर्ते प्रा सचिन गायवळ बोलत होते.

Social activist Sachin Gaiwal secret blast, jamkhed market committee election 2023, I  went with BJP because of NCP's Suresh Bhosle,

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशीद, रविंद्र सुरवसे, बिभीषण धनवडे, लहू शिंदे, बापुराव ढवळे, उदय पवार, बापू माने, अप्पासाहेब ढगे, सरपंच पद्माकर बिरंगळ, उमेदवार सचिन घुमरे, गौतम उतेकर, जालिंदर चव्हाण, विष्णू भोंडवे, मच्छिंद्र गीते, तुषार पवार, गणेश लटके, शरद भोरे, सुरेश शिंदे, गणेश जगताप, अशोक महारनवर, शरद कार्ले, वैजीनाथ पाटील, डॉ. सिताराम ससाणे, नंदु गोरे सह सोनेगाव मधील ग्रामपंचायत व सोसायटी सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Social activist Sachin Gaiwal secret blast, jamkhed market committee election 2023, I  went with BJP because of NCP's Suresh Bhosle,

यावेळी पुढे बोलताना प्रा सचिन गायवळ यांनी आमदार रोहित पवार, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते सुरेश भोसले आणि राळेभात बंधूचा जोरदार समाचार घेतला. गायवळ म्हणाले की, सोनेगाव सोसायटीत मोजकेच सभासद करून घेतात. सुरेश भोसले यांना अशी भीती होती की, मी सोसायटीचा सभासद झालो तर चेअरमन होईल. ग्रामपंचायत व सोसायटी आमच्या कडे येईल.आपले काहीच अस्तित्व राहणार नाही अशी त्यांना भीती होती. म्हणून त्यांनी मला व माझ्या पत्नीला सोनेगाव सोसायटीत सभासद करून घेतले नाही. वर्षभरापूर्वी सचिव गणेश बिरंगळ यांना सर्व कागदपत्रे देऊनही माझ्या पत्नीला संस्थेचे सभासद करून घेतले नाही, असा खळबळजनक आरोप गायवळ यांनी केला.

Social activist Sachin Gaiwal secret blast, jamkhed market committee election 2023, I  went with BJP because of NCP's Suresh Bhosle,

यावेळी गायवळ म्हणाले की, सुरेश भाऊ आयुष्यभर तुमच्याकडे ती फाईल राहू द्या मला दुसऱ्या गावाने सभासद करून घेतले आहे. मला कोणाला व्याजाने पैसे द्यायचे नाहीत. मला कोणाच्या जमिनी बळकावयाच्या नाहीत. घरे लुटायची नाहीत. सुरेश भोसले यांनी आमदाराला फोन लावून सांगितले की, सचिन सर सोसायटी कडे लक्ष देतात, परंतु मी सोसायटी निवडणूकीत पँनल करण्याच्या भुमिकेत नव्हतोच.त्याची मला गरजही नव्हती.परंतु कानफुक्यांच्या सांगण्यावरून आमदारांनी सुर्यकांत मोरे यांना सांगितले की, सचिन सरांना सांगा सोसायटीत लक्ष घालू नका.आमदारांचा आदेश मी पाळला.सुरेश भाऊ तुम्ही मला सभासद करून घेतले नाही,पण मला धनेगाव सोसायटीत सभासद करून घेण्यात आले. तसेच संचालक झालो, संचालक होताना मी हात जोडून मते घेतली.आमची दडपशाही असती तर सभासदांनी निवडून दिले नसते.

यावेळी बोलताना प्रा सचिन गायवळ म्हणाले की, मी सोनेगाव ग्रामपंचायतमध्ये लक्ष घातले की, सुरेश भोसले हे काड्या करायचे, गायवळची सोनेगाव ग्रामपंचायत बिनविरोध होऊ द्यायची नाही यासाठी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी लक्ष घातले होते. मी राष्ट्रवादी सोडण्यासाठी सुरेश भोसले हे कारणीभूत झाले, सुरेश भोसले यांच्यामुळेच मी भाजपसोबत गेलो असा गौप्यस्फोट गायवळ यांनी यावेळी बोलताना केला.

यावेळी गायवळ यांनी जिल्हा बँक निवडणुकीत सोनेगावकरांची राष्ट्रवादीने कशी फसवणूक केली यावरही भाष्य केले. सुरेश भोसलेंचा जिल्हा बँकेला अर्ज भरताना सुचक व अनुमोदकही त्यांच्याकडे नव्हता तरी त्यांचा अर्ज भरण्याचा फार्स आमदार रोहित पवारांनी केला. आमदारांनी राळेभात यांच्यावर दबाव आणला व निवडणूक लावली. पण आमदारांनी राळेभात यांच्याशी तडजोड करत भोसले यांना माघार घ्यायला लावली. आमदार रोहित पवारांनी सोनेगावकरांची म्हणजे सुरेश भोसले यांची जिल्हा बँक निवडणूकीत फसवणूक केली.

यावेळी गायवळ पुढे म्हणाले की,आमचे चुलते छबुराव गायवळ व सुरेश भोसले यांना राळेभात यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून किती त्रास दिला हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. सोनेगावकरांना जर मान स्वाभीमान असेल तर यंदा होत असलेल्या बाजार समिती निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे अवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.