जामखेड : जिल्हा बँक संचालकाच्या मनमानी कारभाराचा उपद्रव थांबवण्याची हीच ती योग्य वेळ – सचिन घुमरे

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । ज्यांना आपण जिल्हा बँकेत संचालक केलं,त्यांना आपण बाजार समिती निवडणुकीत सोबत घेणार होतोत, पण ते लोक सत्तेसाठी कोणाच्याही पाया पडायला तयार झाले, त्यांना शेतकऱ्यांचं कसलही देणंघेणं नाही, ज्यांना जिल्हा बँकेत बसुन तालुक्यातील सोसायट्यांचे पदाधिकारी कसे वापरता येतील, लोकांना कसा त्रास देता येईल हेच त्यांना माहित आहे, अश्यांना आता सहकारातून कायमस्वरूपी घरी बसवण्याची आवश्यकता आहे. यंदा होत असलेल्या बाजार समिती निवडणूकीत स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करून आमदार प्रा.राम शिंदे यांचे हात बळकट करा, असे अवाहन उमेदवार सचिन घुमरे यांनी केले.

It is right time to stop nuisance of arbitrary administration of District Bank Director - Sachin Ghumre, jamkhed market committee election 2023,

जामखेड कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप व मित्रपक्ष प्रणित स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलने 18 तगडे उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरवले आहेत. या उमेदवारांनी तालुका पिंजून काढत मतदारांशी संवाद साधला. मतदारांचा सर्व उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.यावेळी बोलताना उमेदवार सचिन घुमरे म्हणाले की, यंदाच्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलचा विजय निश्चित आहे.

पुढे बोलताना उमेदवार सचिन घुमरे म्हणाले की, जिल्हा बँकेत गेल्यानंतर संचालकांकडून शेतकऱ्यांना अरेरावीची भाषा केली जाते. काही सोसायट्यांमध्ये कर्ज वाटप थांबवलयं, संचालकांचा मनमानी कारभार सुरु आहे. हा उपद्रव जर आपल्याला थांबवायचं असेल तर यांना मताच्या रूपानं त्यांची जागा दाखवून देण्याची गरज आहे. त्यामुळे सोसायटी मतदार संघातील सर्व उमेदवारांनी संचालकाला धडा शिकवावा असे अवाहन यावेळी त्यांनी केले.