Sangali Nalsab Mulla : धारदार शस्त्राने वार,8 वेळा गोळीबार, भरवस्तीत खूनाचा थरार, सांगलीत NCP कार्यकर्त्याची हत्या ! खुनाच्या घटनेने सांगली जिल्हा हादरला !

सांगली : Sangali Nalsab Mulla murder news : राजकीय कार्यकर्त्याच्या हत्याकांडाच्या घटनेने शनिवारी रात्री सांगली जिल्हा हादरला. सांगलीतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नालसाब मुल्ला यांची राहत्या घरासमोर गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या हल्ल्यात हल्लेखोरांनी 8 वेळा मुल्ला यांच्यावर गोळीबार केला.ही घटना सांगलीतील शंभरफुटी रोडवर घडली.गजबजलेल्या परिसरात अचानक गोळीबाराची घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. खूनाच्या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Sangali Nalsab Mulla ,Stabbed with sharp weapon, 8 times shot NCP worker killed, Sangli district was shaken by the incident of Nalsab Mulla murder, sangali murder news,

सांगलीतील विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री आठ ते साठेच्या सुमारास राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नालसाब मुल्ला यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यावेळी हल्लेखोरांनी मुल्ला यांच्यावर तब्बल आठ वेळा गोळीबार केला. त्यानंतर धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार करण्यात आली. अतिशय निर्घृण पणे नालसाब मुल्ला यांची हत्या करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

नालसाब मुल्ला यांच्यावर हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करत गोळीबार केला. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नालसाब मुल्ला यांना उपचारासाठी तातडीने शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. परंतू त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाला पंचनामा केला. आरोपींच्या शोधासाठी सांगली पोलिसांची वेगवेगळी पथके रवाना झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख बसवराज तेली, डीवायएसपी अण्णासाहेब जाधव आणि इतर पोलीस अधिकार दाखल झाले. घटनास्थळी पोलीस मोठ्या संख्येने दाखल झाले. परिसरात तणावपूर्ण वातावरण होतं. त्यामुळे पोलीसही सतर्क झाले. पोलिसांकडून सध्या संपूर्ण काळजी घेतली जातेय.

संबंधित घटनेचे धागेदोर आता नेमके कुठपर्यंत जातात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सांगली शहरात रात्रीच्या साडे आठ वाजेच्या सुमारास अशाप्रकारची घटना घडने हे धक्कादायक आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही हे या घटनेतून नमूद होतंय, अशी चर्चा आता सांगली शहरात जोर धरु लागली आहे. तसेच या घटनेनंतर परिसरातील स्थानिक नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण आहे.

नालसाब मुल्ला यांच्यावर अनेक गुन्हे दाखल होते. गँगवॉरमधून त्यांची हत्या करण्यात आली असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी चोहोबाजूंनी या घटनेचा तपास वेगाने हाती घेतला आहे.