ACB Maharashtra Latest News : लालच बुरी बलाचा मास्तरीण बाईला जोरदार झटका; मुख्याध्यापिका अडकली एसीबीच्या जाळ्यात !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : ACB Maharashtra Latest News : लालचीपणा एक ना एक दिवस माणसाला संकटात आणतोच. लालच बुरी बला ही म्हण त्यामुळे प्रचलित आहे. परंतू तरीही लालची माणसं आपला लालचीपणा सवय सोडत नाहीत. लालचीपणा माणसाला किती महागात पडू शकतो याचं ताजं उदाहरण नांदेड जिल्ह्यातून समोर आलं आहे. एका मुख्याध्यापिकेला आपला लालचीपणा चांगलाच अंगलट आला आहे. दाखला देण्यासाठी लाच घेताना एका मुख्याध्यापिकेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवारी करण्यात आली. (Kinwat news today)
नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील सरस्वती विद्यामंदिर या प्राथमिक शाळेत इयत्ता सातवी पास झालेल्या विद्यार्थिनीचा दाखला देण्यासाठी मुख्याध्यापिका विणा नेम्मानीवार यांनी विद्यार्थीच्या वडिलांकडे 600 रुपयांची मागणी केली होती. मुलीच्या वडिलांनी 600 रूपये कश्यासाठी असे विचारल्यावर मुख्याध्यापिका विणा नेम्मानीवार यांनी हे पैसे द्यावेच लागतील असे ठणकावले होते.ही घटना 16 जून रोजी घडली होती. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे मुलीच्या वडिलांनी तक्रार केली होती.(kinwat ACB Trap)
एसीबीने लाच मागणी पडताळणी केली असताना मुख्याध्यापिका नेम्मानीवार यांनी तडजोडीअंती 400 रुपयांची मागणी केली. तसेच या पैशाची कोणतीही पावती मिळणार नाही असेही सांगितले.त्यानंतर शनिवारी शाळेतच सापळा रचण्यात आला. तक्रारदाराने मुख्याध्यापिका नेम्मानीवार यांना 400 रुपये दिले. तसेच पावतीची मागणी केली; परंतु नेम्मानीवार यांनी पावती देण्यास नकार दिला. त्यानंतर नेम्मानीवार यांना एसीबीने ताब्यात घेतले. या प्रकरणात किनवट पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. ( nanded acb Trap)
किनवट येथील सरस्वती विद्यामंदिर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका विणा नेम्मानीवार यांना एसीबीने 400 रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केल्याची बातमी समोर नांदेड सह राज्याच्या शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली. दाखल्यासाठी जर शिक्षक पालकांकडून अवाजवी पैसे घेत असतील तर अशा घटना शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या तर ठरतच आहेत. तसेच या घटना शिक्षण क्षेत्रात बोकाळलेला भ्रष्टाचाराचा काळा चेहरा उजेडात आणणार्या ठरत आहेत.