Karjat Jamkhed constituency | रोहित पवार व राम शिंदे आले एकाच कार्यक्रमात आमने – सामने; दोन्ही नेते शेजारी- शेजारी बसले खरे पण….

Karjat - Jamkhed constituency | rohit pawar and ram shinde came together at the same event in Karjat - Jamkhed constituency

जामखेड टाईम्स वृत्तसेवा ( सत्तार शेख, डाॅ अफरोज पठाण ) : Karjat Jamkhed constituency | राम शिंदे विरूध्द रोहित पवार या संघर्षाने कर्जत – जामखेड मतदारसंघातील राजकीय वातावरण आधीच तापलेले आहे. भाजपच्या काही नेत्यांना फोडून रोहित पवारांनी राजकीय संघर्षाचा बार उडवून दिलेला आहे. भाजप विरूध्द राष्ट्रवादी संघर्षामुळे राजकीय वातावरण तापलेले आहे. त्यातच गेल्या आठवडाभरापासून माजी मंत्री राम शिंदे यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे. गाठीभेटीमुळे वातावरण चांगलचं ढवळून निघालेले आहे. (rohit pawar and ram shinde came together at the same event in Karjat Jamkhed constituency)

राजकीय गरमा गरमीच्या वातावरणामुळे सध्या राजकीय वर्तुळात धुराळा उडालेला आहे. अश्यातच आमदार रोहित पवार व माजी मंत्री राम शिंदे हे दोघे एकाच व्यासपीठावर आले तर ? होय अशीच घटना शुक्रवारी कर्जतमध्ये घडली आहे. निमित्त होते सर्व सामाजिक संघटनांनी आयोजित केलेल्या वर्षपुर्ती श्रमदान कार्यक्रमाचे.

Karjat Jamkhed constituency | rohit pawar and ram shinde came together at the same event in Karjat - Jamkhed constituency

आमदार रोहित पवार व माजी मंत्री राम शिंदे दोन्ही आज कर्जतमधील एका कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. दोन्ही नेते शेजारी शेजारी बसले खरे पण कार्यक्रम संपेपर्यंत ऐकमेकांशी दोन्ही नेत्यांनी काहीच संवाद साधला. भाषणात ऐकमेकांवर चिखलफेक करतील अशी अपेक्षा अनेकांना होती. परंतू दोन्ही नेत्यांनी कार्यक्रमावरच भाष्य केले. यामुळे उपस्थितांना राजकीय जुगलबंदीला मुकावे लागले. परंतू कार्यक्रम संपल्यानंतर दोन्ही नेत्यांनी ऐकमेकांशी हस्तांदोलन करत कार्यक्रमातून निरोप घेतला.

विधानसभा निवडणुकीच्या निकालादिवशी आमदार रोहित पवारांनी माजी मंत्री राम शिंदे यांची भेट घेतली होती. त्यावेळी राम शिंदे यांनी  रोहित पवारांचा सत्कार केला होता. त्यानंतर प्रथमच शिंदे व पवार एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते.

Karjat Jamkhed constituency | rohit pawar and ram shinde came together at the same event in Karjat - Jamkhed constituency

मागील दोन वर्षात शिंदे विरूध्द पवार हा संघर्ष अधिकच चिघळलेला आहे. दोन्ही नेते ऐकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. यामुळे राजकीय वातावरण भलतेच तापलेले आहे. अश्या तापलेल्या वातावरणात दोन्ही नेत्यांनी सामाजिक संघटनांच्या कार्यक्रमात एकाच वेळी उपस्थित राहून वेगळाच संदेश मतदारसंघात दिला आहे.सामाजिक काम करणाऱ्या व्यक्ती संघटनांना यांना बळ देण्यासाठी दोन्ही नेत्यांनी कंबर कसल्याचे यातून अधोरेखित झाले आहे.

कर्जत येथील सर्व सामाजिक संघटना मागील वर्षभरापासून स्वच्छता, वृक्षारोपण सह आदी सामाजिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने कर्जत तालुक्यात राबवत आहेत. शुक्रवारी या कार्यक्रमाची वर्षपुर्ती झाली. त्यानिमित्त भव्य महावृक्षारोपण अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण अभिनेत्री गौरी कुलकर्णी व प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे हे होते. परंतु कार्यक्रमात चर्चा झाली ती रोहित पवार व राम शिंदे यांच्या उपस्थितीची.

Karjat Jamkhed constituency | rohit pawar and ram shinde came together at the same event in Karjat - Jamkhed constituency

कार्यक्रमात कोण काय म्हणाले ?

सर्व सामाजिक संघटनेचे कार्य कौतुकास्पद – माजीमंत्री प्रा. राम शिंदे

माजीमंत्री प्रा. राम शिंदे मनोगत व्यक्त करताना म्हंटले की, कर्जत येथील सर्व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सुरु असलेल्या स्वच्छता आणि निसर्ग संवर्धन या कार्यामुळे कर्जतकरांचे नाव निश्चितच राज्य आणि देशपातळीवर जाईल यात शंका नाही. सर्व सामाजिक संघटनेचे मागील ३६३ दिवसांपासून अनेक भागाचे कायापालट केले आहे. त्यामुळे त्यांचे हे कार्यच त्यांच्या जमेची बाजू ठरली आहे.  या अभियाना बरोबर आपणही जोडलेले आहोत आणि यापुढे देखील कायम राहू असे आश्वासन दिले.

पिवळा टी शर्ट स्वच्छतादूताचे प्रतीक – आमदार रोहित पवार

यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले कि,  कर्जत शहर आणि परिसराचे नाव उंचावण्यासाठी कर्जत येथे सर्व सामाजिक संघटनांचे सर्व स्वयंसेवकांनी केलेले कष्ट निश्चितच वाखाणण्याजोगी आहे. भविष्यात कर्जतचे नाव उंचावण्यासाठी आपणही अभियाना बरोबर निश्चित राहू या अभियानासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल. मागील वर्षभरापासून कर्जतच्या सर्व सामाजिक संघटनेच्या सर्व शिलेदारानी पिवळा टी शर्ट परिधान करीत कर्जत शहराचा चेहरा-मोहरा बदलला आहे. त्यामुळे पिवळा टी शर्ट स्वच्छतादूताचे प्रतीक म्हणून पाहिले जात आहे.

प्रसिध्द व्याख्याते गणेश शिंदे काय म्हणाले ?

निसर्गाशी नाळ जोडली तरच पुढील आयुष्य निरोगी असेल यासाठी पर्यावरण संवर्धनाला भावी आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व द्यावे लागेल.भविष्यात जर निरोगी जगायचे असेल तर निसर्गाशी नाळ जोडावी लागेल आणि वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज असेल.आज भौतिक सुखाने माणूस त्रस्त झालेला आहे त्याला सुखी आणि समाधानी ठेवण्यासाठी निसर्गच मदत करू शकतो असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य अटल पणन अभियानाचे मुख्य व्याख्याते गणेश शिंदे यांनी केले आहे.

अभिनेत्री गौरी कुलकर्णी काय म्हणाल्या ?

कर्जतमध्ये सर्व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या स्वच्छता आणि निसर्ग संवर्धनाच्या कार्यक्रमा मुळे आपण भारावून गेलो आहे अशीच मोहीम गावागावात जर सुरू राहिली तर निश्चितच महाराष्ट्राचे चित्र बदललेले दिसेल.

कर्जतकरांनी केला विक्रम : एकाच दिवशी केले 6 हजार वृक्षांचे रोपण

कार्यक्रमाचे प्रास्ताविकात सर्व सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी तथा निवृत्त वनाधिकारी अनिल तोरडमल यांनी वर्षभर सामाजिक संघटनेने केलेल्या कार्याचा लेखाजोखा त्यांनी मांडला. यावेळी या कार्यक्रमाला समाजातील सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या महावृक्षारोपण कार्यक्रमात एकाच वेळी सहा हजार झाडे लावण्याचा विक्रम नोंदण्यात आला. या अभियानात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. कर्जत शहरातून या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे वर्षपूर्ती निमित्त या अभियानात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांना सन्मानित करण्यात आले यावेळी अनेकांनी रोख स्वरूपात मदत जाहीर केली.

Karjat Jamkhed constituency | rohit pawar and ram shinde came together at the same event in Karjat - Jamkhed constituency

सर्व सामाजिक संघटनांचे तीन दिवसीय कार्यक्रम

सर्व सामाजिक संघटना आणि कर्जत नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या अभियानाला एक वर्ष पूर्ण झाली असून यावेळी तीन दिवसीय भरगच्च असे कार्यक्रम घेण्यात आले आहे यात ३० सप्टेंबर रोजी शहरात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यात लहान-मोठ्या ४८० सायकल प्रेमींनी सहभाग नोंदवला आहे. यात लकी ड्रॉ द्वारे चार भाग्यवंतांना सायकल बक्षीस देण्यात आले आहे. तर दिनांक २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने कर्जत शहरात हेस्टॅक द्वारी व्हर्च्युअल श्रमदान मोहीम राबविण्यात येणार आहे यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.

कार्यक्रमासाठी यांनी लावली उपस्थिती

या कार्यक्रमासाठी स्टार प्रवाह वरील मालिका आई कुठे काय करते यातील अभिनेत्री गौरी कुलकर्णी, कर्जत जामखेड मतदार संघाचे आ रोहित पवार, माजीमंत्री प्रा. राम शिंदे प्रांताधिकारी तथा कर्जत नगरपंचायत प्रशासक डॉ. अजित थोरबोले, तहसीलदार नानासाहेब आगळे, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव, गटविकास अधिकारी अमोल जाधव, वनविभागाचे सागर केदार, बारामती अग्रीकल्चरल डेव्हलपमेंटच्या विश्ववस्त सुनंदाताई पवार,बारामती ऍग्रोचे राजेंद्र पवार, व्हीआयपी समूहाचे विनोद खुटे यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यापार, सहकार क्षेत्रातील आदी मान्यवर उपस्थित होते.

 

web titel : Karjat Jamkhed constituency | rohit pawar and ram shinde came together at the same event in Karjat Jamkhed constituency