Jamkhed Nagar Parishad electricity bill | मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी उचलले महत्वाचे पाऊल; ‘या’ कारणामुळे जामखेड नगरपरिषदेचे लाखो रूपये वाचणार

शहरात तब्बल 02 हजार 370 LED पथदिवे बसवले जाणार

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Jamkhed Nagar Parishad electricity bill | वाढत्या महागाईच्या काळात भरमसाठ येणारे वीजबिले अनेकांची डोकेदुखी वाढवणारे ठरत असतात. याला शासकीय संस्थाही अपवाद ठरत नाही. शासकीय संस्थांनाही भरमसाठ वीजबिले भरता भरता नाकी नऊ येतात. विजेची बचत होण्यासाठी शासनस्तरावरून वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जातात.जामखेड शहरातही जामखेड नगरपरिषदेच्या (Jamkhed Municipal Council) माध्यमांतून वीजबचतीसाठी मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.

केंद्र व राज्य सरकारकडून ऊर्जा संवर्धन मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेतून वेगवेगळ्या शहरातील जुने पारंपारिक विजेचे पथदिवे हद्दपार केले जात आहे. जुन्या दिव्यांमुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जा वापरली जाते. ऊर्जाखाऊ जूने दिवे बदलून त्याऐवजी नवे LED पथदिवे बसवण्याचे धोरण शासनाने हाती घेतले आहे. याच धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जामखेड नगरपरिषद (Jamkhed Nagar Parishad) सरसावली आहे.

जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी यासंबंधी पुढाकार घेतला आहे. दंडवते यांच्या पुढाकारातून शहरात तब्बल 02 हजार 370 LED पथदिवे बसवले जाणार आहेत. हे काम चोखपणे व्हावे यासाठी दंडवते यांनी अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे.पहिल्या टप्प्यात 01 हजार 200 पथदिवे बसवले जाणार आहेत.

मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांच्या पुढाकारातून राबवल्या जाणाऱ्या ऊर्जा संवर्धन योजनेमुळे जामखेड नगरपरिषदेचे वीजबिलापोटी लाखो रूपयांची बचत होणार आहे. वाचलेले लाखो रूपये शहर विकासात कामी येण्यास मदत होणार आहे.(LED streetlights will save millions in Jamkhed Nagar Parishad electricity bill)

शहरात बसवले जाणारे LED पथदिवे दिवाळीपूर्वी शहरात बसवण्याचे नियोजन नगरपरिषदेने आखले आहे. 01 ऑक्टोबर रोजी या योजनेचा शहरात प्रारंभ करण्यात आला. दिवाळी पूर्वी नगरपरिषदेने हाती घेतलेले पथदिवे बसवण्याचे काम पुर्ण झाल्यास शहरवासियांना दिवाळीचा वेगळाच झगमगाट अनुभवता येणार आहे.

जामखेड शहरातील सर्व भागात जुने पारंपरिक जास्त ऊर्जाखाऊ पथदिवे बसविण्यात आले होते. शहरात असलेले जुने पथदिवे सतत बंद राहत असल्याने नागरिकांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. साहित्य खरेदी, देखभाल दुरुस्ती व मासिक वीज देयक खर्च मोठा होता या खर्चाची आता बचत होणार आहे.

जामखेड नगरपरिषद अंतर्गत महाराष्ट्र शासन उर्जा संवर्धन धोरण दि. 22  जून 2017 व नगरविकास विभागाच्या दि. 12 जानेवारी 2018 आणि दि. 04 जून 2018 शासननिर्णयान्वये EESL (केंद्रशासन पुरस्कृत कंपनी) मार्पज जुने पारंपारिक उर्जाखाऊ पथदिवे बदलून त्या जागी कार्यक्षम LED पथदिवे बसविणे बाबत करारनामा केलेला आहे. त्यानुसार शहरात 02 हजार 370 पथदिवे बसवले जाणार आहेत.

 

web titel : Jamkhed Nagar Parishad electricity bill | LED streetlights will save millions in Jamkhed Nagar Parishad electricity bill