धक्कादायक : ज्योतिषाकडून मुहूर्त काढून टाकला दरोडा, 1 कोटी 7 लाखांच्या दरोड्याप्रकरणी 6 दरोडेखोरांना अटक

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : एक कोटी सात लाख रूपयांच्या दरोडा (Baramati Devkatenagar robbery) प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. धक्कादायक म्हणजे हा दरोडा ज्योतिषाकडून मुहूर्त (Muhurat from astrologer) काढून टाकण्यात आल्याची बाब पोलिस तपासात (Police investigation) समोर आली. या दरोड्याप्रकरणी सहा दरोडेखोरांना अटक (6 robbers arrested) करण्यात आली आहे. ही कारवाई बारामती (Baramati Police) आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या एलसीबी टीमने पार पाडली. (Pune Gramin LCB )

robbery by taking away muhurat from astrologer, 6 robbers arrested in connection with robbery of 1 crore 7 lakh rupees, baramati devkatenagar robbery, Baramati pune gramin lcb news,

पुणे जिल्ह्यातील बारामती शहरातील देवकातेनगर भागातील सागर शिवाजी गोफणे (sagar shivaji gophane) हे आपल्या कुटूंबासह राहतात. दि. २१ एप्रिल रोजी सागर हे तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेले होते. तर त्यांची पत्नी व दोन मुले घरी होती. यावेळी रात्री आठ वाजता अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या घराच्या कंपाऊंडवरून प्रवेश केला. सागर गोफणे यांच्या पत्नीला चोरट्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांचे हात-पाय बांधले. आरडाओरड करू नये म्हणुन चोरट्यांनी त्यांच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबूला होता.

यावेळी चोरट्यांनी सागर गोफणे यांच्या घरात प्रवेश करून ९५ लाख ३० हजाराची रोख रक्कम, ११ लाख ५९ हजार रुपयांचे २० तोळे दागिने, ३५ हजार रुपयांचा मोबाईल असा १ कोटी ७ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. एक कोटी सात लाख रूपयांच्या दरोड्याची घटना उघडकीस आल्यानंतर बारामतीसह पुणे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती.

या घटनेप्रकरणी बारामती तालुका पोलिस स्टेशनला अज्ञातांविरोधात दरोड्यााच गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घटनेमुळे पोलिस यंत्रणा हादरून गेली होती. या प्रकरणाच्या तपासावर विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी (Special Inspector General of Police Sunil Fulari) यांनी जातीने लक्ष घातले होते. त्यामुळे सदर प्रकरणातील दरोडेखोरांना अटक करण्यासाठी पोलिस यंत्रणा वेगाने कामाला लागली होती.या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिस अधिक्षक अंकित गोयल (SP Ankit Goyal ips ) यांनी स्थानिक गुन्हे शाखेची पथके नेमली होती.

गोपनीय माहितीच्या आधारे लागला छडा

विशेष म्हणजे आपण पकडले जावू नये, याची पुरेपुर खबरदारी आरोपींनी घेतली होती. कोणताही मागमूस मागे ठेवला नव्हता.तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे सदर प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू ठेवला होता. या गुन्ह्यातील आरोपी एमआयडीसीतील मजूर असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संशयितांवर बारकाईने नजर ठेवली. अखेर साडेतीन महिन्यांनंतर आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले.

सहा दरोडेखोरांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी सहाजणांना अटक केली आहे. ज्योतिषाकडून मुहुर्त काढुन आरोपींनी हा गुुन्हा केल्याची माहिती तपासात पुढे आली. या प्रकरणात सचिन अशोक जगधणे (वय ३०, रा. गुणवडी, २९ फाटा, ता. बारामती), रायबा तानाजी चव्हाण (वय ३२, रा. शेटफळ हवेली, ता. इंदापूर), रविंद्र शिवाजी भोसले (वय २७, रा. निरावागज, बारामती), दुर्योधन उर्फ दिपक उर्फ पप्पू धनाजी जाधव (वय ३५, रा. जिंती हायस्कूलजवळ, ता. फलटण, जि. सातारा), नितीन अर्जून मोरे (वय ३६, रा. धर्मपुरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याच्यासह रामचंद्र वामन चव्हाण (वय ४३, मूळ रा. आंदरुड, ता. फलटण, जि. सातारा, सध्या रा. वडूज, ता.खटाव, जि. सातारा) या सहा दरोडेखोरांना बारामती पोलिस व एलसीबीच्या पथकांनी अटक केली आहे.

७६ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

बारामती येथील देवकातेनगर येथील दरोड्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सहा दरोडेखोरांकडून ७६ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यात ६० लाख ९७ हजाराची रोख रक्कम असून १५ लाख ३५ हजार रुपये किमतीचे २६ तोळ्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.