Nageshwar Yatra : श्री नागेश्वर यात्रेनिमित्त जामखेडमध्ये पार पडला भव्य दिव्य पालखी सोहळा, हरहर महादेवाच्या अन् ज्ञानोबा – तुकोबाच्या जयघोषात हजारो भाविकांनी घेतले नागेश्वराचे दर्शन

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख । गेल्या अनेक वर्षांपासून नागपंचमी निमित्त जामखेडचे ग्रामदैवत श्री नागेश्वराची यात्रा भरते. पुर्वी नर्तिकांच्या नाचगाण्यांसाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या या यात्रेने गेल्या 20 वर्षांपुर्वी कुस बदलली.यात्रेचा प्रवास चाळाकडून टाळाकडे सुरू झाला.गेल्या 20 वर्षांपासून यात्रेच्या आधी अखंड हरिनाम सप्ताह व यात्रेच्या मुख्य दिवशी (नागपंचमी दिवशी) श्री नागेश्वराचा भव्य दिव्य पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाऊ लागले. त्यामुळे यात्रोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरी होऊ लागली. नागपंचमी निमित्त भरणाऱ्या जामखेडच्या नागेश्वर यात्रेची राज्यात आता वेगळी ओळख प्रस्थापित झाली आहे. यंदा यात्रोत्सवास मोठ्या उत्साहात सुरूवात झाली आहे.

On the occasion of Shree Nageshwar Yatra grand divine palanquin ceremony was held in jamkhed, thousands of devotees took darshan of Nageshwar amid the chanting of Harhar Mahadeva and Gyanoba-Tukoba,

सोमवारी, श्री नागेश्वर यात्रेनिमित्त आयोजित भव्य दिव्य पालखी सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्यात हजारो भाविकांनी हजेरी लावली. पालखी सोहळा सुरू होण्यापूर्वी पोलीस निरीक्षक महेश विष्णू पाटील व त्यांच्या सौभाग्यवती आशा महेश पाटील यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता श्रीनागेश्वराची विधिवत पूजा व आरती करण्यात आली. त्यानंतर श्रीनागेश्वराचा मुखवटा पालखीमध्ये ठेवण्यात आला.

On the occasion of Shree Nageshwar Yatra grand divine palanquin ceremony was held in jamkhed, thousands of devotees took darshan of Nageshwar amid the chanting of Harhar Mahadeva and Gyanoba-Tukoba,

या पालखी सोहळ्यासाठी जामखेड व पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळांनी मंदिरासमोर भजन सुरू केले. विठोबा रखुमाई भजन होताच श्री व सौ पाटील यांच्या हस्ते पालखीमध्ये श्रीनागेश्वराचा मुखवटा स्थापन करण्यात आला. यावेळी

भस्म उटी रुंड मळा ! हा महादेवाचा अभंग घेऊन पालखी उचलण्यात आली. यावेळी  हर हर महादेवाचा जयजयकार झाला. त्यानंतर ही पालखी रथामध्ये ठेवण्यात आली. हरहर महादेवाच्या व ज्ञानोबा तुकाराम च्या जयघोषात व पंचक्रोशीतील भजनी मंडळांच्या टाळ मृदुंगांच्या गजरात पालखी मिरवणुकीस सुरुवात झाली.

On the occasion of Shree Nageshwar Yatra grand divine palanquin ceremony was held in jamkhed, thousands of devotees took darshan of Nageshwar amid the chanting of Harhar Mahadeva and Gyanoba-Tukoba,

श्रीनागेश्वर मंदिरापासून पालखी मिरवणूकीस सुरूवात झाली. त्यानंतर ही पालखी श्रीनागेश्वर महाद्वारापासून खर्डा रस्ता, लक्ष्मी चौक, संविधान चौक, श्रीविठ्ठल मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजपेठ, शनी मारुती मंदिर, जयहिंद चौक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मार्ग, जुने कोर्ट, महादेव गल्ली लक्ष्मी चौक मार्गे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून वैतरणा नदी तीरातून नव्याने निर्माण करण्यात आलेल्या पालखी मार्गावरून हा सोहळा पुन्हा श्रीनागेश्वर मंदिर येथे पोहोचला.

On the occasion of Shree Nageshwar Yatra grand divine palanquin ceremony was held in jamkhed, thousands of devotees took darshan of Nageshwar amid the chanting of Harhar Mahadeva and Gyanoba-Tukoba,

कीर्तन मंडपात दिंडी पोहोचल्यानंतर संत भार पंढरीत हा अभंग घेण्यात आला व सांगता आरती करण्यात आली.  यावेळी प्रा. मधुकर आबा राळेभात , दत्तात्रेय  वारे, सुर्यकांत मोरे , रमेश आजबे, अमित चिंतामणी, महेश निमोणकर, पवनराजे राळेभात दिगंबर चव्हाण, गणेश डोंगरे , रमेश वराट ,संजीवन मेंढकर, जयसिंग उगले, शिवनेरीचे कॅप्टन भोरे, पांडूराजे भोसले , अमोल लोकरे आदी उपस्थित होते.

भजनी मंडळाचे पंढरीनाथ महाराज राजगुरू, सीताराम राळेभात, रावसाहेब कोल्हे, आश्रू कोल्हे, भाऊसाहेब कोल्हे, ईश्वर महाराज तौर, सुदाम महाराज गायकवाड, दादासाहेब महाराज सातपुते, मृदंगाचार्य स्वप्निल महाराज खोरे, हरिदास महाराज गुंड, जगन्नाथ धर्माधिकारी, शंकर माळी,शेषेराव मुरूमकर, मुरलीधर काळे,  गिरधारीलाल ओझा, संतोष राळेभात पाटील, विठ्ठल भजनी मंडळ, श्रीनागेश्वर भजनी मंडळ, तपनेश्वर भजनी मंडळ, जमादारवाडी भजनी मंडळ, संत वामनभाऊ महाराज वारकरी शिक्षण संस्था, जगदाळे वस्ती भजनी मंडळ, बटेवाडी भजनी मंडळ व पंचक्रोशीतील भजनी मंडळे आबासाहेब महाराज वटाणे व त्यांचे विद्यार्थी व परिसरातील टाळकरी  मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .कलशधारी महिला,पताकाधारी तरूण मुले यांच्या सहभागामुळे दिंडीला शोभा आली.

दिंडी मार्गावर महिलांनी सडा रांगोळी केली होती. शहरात ठिकठिकाणी पालखी दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती.एकूणच संपूर्ण जामखेड शहर आज भक्तीमय झाले होते. दुपारी दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रातील सेवेकरांनी रुद्र याग व होम हवन केले.

दरम्यान पालखी सोहळ्यानिमित्त येथे सात दिवस अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी संध्याकाळी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक आत्माराम महाराज कुटे, मंगळवारी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक परमेश्वर महाराज जायभाये, बुधवारी २३ ऑगस्टला रघुनाथ महाराज चौधरी धामणगावकर यांचे काल्याचे कीर्तन होईल. व शेवटी महाप्रसादाने या संपूर्ण उत्सवाची सांगता होईल.

या संपूर्ण उत्सवासाठी श्रीनागेश्वर सेवा मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब खराडे, बबलू देशमुख, मिलिंद ब्रम्हे, संतोष बारगजे, विनायक राऊत, शंकर राऊत, प्रवीण राऊत, आनंद राजगुरू, दिलीप कुमार राजगुरू, महादेव पानसाडे, बबन सुर्यवंशी, किरण सोनवणे,नंदू शिंदे, प्रशांत काळे, सचिन म्हेत्रे, रोहित पोकळे, ओम गुरव, अहोरात्र अथक परिश्रम घेत आहेत.