MPSC विद्यार्थीनी हल्ला प्रकरण : Leshpal javalge, आज तुझ्यामुळे एक जीव वाचला, तुझे करावे तेवढे कौतुक कमी आहे

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : पुण्याच्या सदाशिव पेठेत मंगळवारी सकाळी MPSC च्या विद्यार्थीनीवर कोयत्याने हल्ला करण्याची खळबळजनक घटना घडली होती. या घटनेत दोघा तरूणांनी दाखवलेल्या धाडसामुळे त्या तरुणीचा जीव वाचला होता. या प्रकरणातील हल्लेखोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या घटनेत धाडस दाखवणाऱ्या लेशपाल जवळगे (Leshpal javalge) या तरूणाच्या धाडसाचे राज्य महिला आयोगाच्या (State Commission for Women ) अध्यक्षा रूपालीताई चाकणकर (Rupalitai Chankankar) यांनी केले आहे. 

pune MPSC student assault case, Leshpal, you saved life today,You have little to admire, Rupalitai Chakankar appreciated the courage of Leshpal javalge, Pune crime news latest,

आज पुण्यामध्ये कोयत्याने तरुणीवर हल्ला करण्याचा गंभीर प्रकार घडला. यावेळी प्रसंगावधान दाखवत लेशपाल जवळगे या तरुणाने आपल्या जीवाची बाजी लावून त्या पिडीत मुलीला हल्ल्यातून वाचवले. यावेळी गुन्हेगाराच्या हातातील कोयता हिसकावून घेताना लेशपालच्या बोटाला लहान इजा झाली आहे. लेशपाल तुझ्या धाडसाचे कौतुक वाटते, तू जीवनदान देण्याचे अमूल्य कार्य केले आहे. लेशपाल, आज तुझ्यामुळे एक जीव वाचला, तुझे करावे तेवढे कौतुक कमी आहे, अशी फेसबुक पोस्ट करत चाकणकर यांनी लेशपाल याच्या धाडसाचं कौतुक केलं आहे.

सदाशिव पेठेत नेमकं काय घडलं ?

मंगळवारी पुणे शहरातील सदाशिव पेठ भागातून एक तरूणी आपल्या मित्रासमवेत स्कुटीवरून जात होती. त्यावेळी शंतनू लक्ष्मण जाधव (वय २२, रा. मुळशी) या तरूणाने तिच्यावर कोयत्याने हल्ला केला. सकाळी 10 वाजता ही घटना घडली. तरूणाने हल्ला करताच तरूणी रस्त्यावर धावत सुटली होती, वाचवा वाचवा म्हणून ती लोकांकडे मदत मागत होती. परंतू तिच्या मदतीला तात्काळ कोणीच आले नाही.

परंतु काही वेळानंतर ती धावत असतानाच तिच्यावर हल्लेखोर तरूण हल्ला करणार तोच दोन तरूण तिच्या मदतीला आले. शंतनू जाधव याच्या हातून कोयता हिसकावून घेत दोघा युवकांनी तरुणीचा जीव वाचला आहे. त्यानंतर वार करणाऱ्या आरोपीला चोप देत पेरू गेट पोलीस चौकी येथे नेण्यात आलं एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला झाल्याचे बोलले जात आहे.या घटनेत दोघेही तरुण तसेच तरुणी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करत आहेत.