मोठी बातमी : धडाकेबाज IAS अधिकारी Sunil Kendrekar यांनी घेतला VRS चा निर्णय

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्याच्या प्रशासकीय वर्तुळातील धडाकेबाज आयएएस अधिकारी अशी ओळख असलेल्या सुनिल केंद्रेकर (Sunil kendrekar IAS) यांनी स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतला आहे. त्यांनी काही दिवसांपुर्वी सरकारकडे यासंबंधी केलेला अर्ज सरकारकडून मंजुर करण्यात आला आहे. केंद्रेकर हे साधी राहणीमानी आणि धडाकेबाज निर्णयासाठी राज्यात प्रसिध्द होते.

dashing IAS officerSunil Kendrekar took VRS decision, Sunil kendrekar latest news

सुनिल केंद्रेकर यांनी मागील महिन्यात सरकारकडे VRS साठी अर्ज केला होता.सध्या ते छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त म्हणून काम पाहत होते. सरकारने केंद्रेकर यांचा अर्ज मंजुर केला आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये त्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त पदाचा पदभार घेतला होता.

सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव (सेवा) नितिन गद्रे यांन सुनिल केंद्रेकर यांना एक पत्र लिहले आहे. त्यात म्हटले आहे की, आपण दिनांक २४.०५.२०२३ आणि दिनांक २६.०५.२०२३ रोजी शासनास सादर केलेल्या स्वेच्छा सेवानिवृत्तीच्या अर्जानुसार, आपणांस दिनांक ०३.०७.२०२३ ( मध्यान्हपूर्व ) रोजी भारतीय प्रशासन सेवेतून स्वेच्छा सेवानिवृत्ती घेण्यास मान्यता देण्यात येत आहे.

आपल्या सेवा कालावधीमध्ये आपण दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबदद्ल शासन आपले आभारी आहे. तरी, आपण आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार अपर मुख्य सचिव (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क) यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्याकडे सोपवून दिनांक ०३.०७.२०२३ (म.पू) रोजी स्वेच्छा सेवानिवृत्त व्हावे.

सुनिल केंद्रेकर यांनी छत्रपती संभाजीनगर येथे विक्रीकर सहआयुक्त, प्रभारी जिल्हाधिकारी, बीडचे जिल्हाधिकारी, सिडकोचे मुख्य प्रशासक, प्रभारी मनपा आयुक्त या पदावर काम केले. त्यानंतर त्यांची कृषी आयुक्त पुणे या पदावर बदली झाली. नंतर क्रीडा विभागात बदली झाली. त्यानंतर ते विभागीय आयुक्त म्हणून छत्रपती संभाजीनगर येथे परतले.त्यांच्या सेवेची अजून दोन ते तीन वर्षे बाकी होती. त्याआधीच त्यांनी VRS चा निर्णय घेतला. या निर्णयाचे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

dashing IAS officerSunil Kendrekar took VRS decision, Sunil kendrekar latest news