Pune Anti Corruption Bureau | लाचखोर जात पडताळणी अधिकाऱ्याच्या घरात सापडले कोट्यावधीचे घबाड : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडाकेबाज कारवाई 

पुणे : Pune Anti Corruption Bureau | जात प्रमाणपत्राची पडताळणी (Verification of caste certificate) करण्यासाठी लाखो रूपयांची लाचलाच (Bribe) घेणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सदस्याला भलतेच महागात पडले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत लाचखोर उपायुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सदस्य नितीन चंद्रकांत ढगे (Nitin Chandrakant dhage) (वय-40) यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. लाचलुचपतने ढगे यांच्या घरी छापेमारी केली. यात कोट्यावधींचे घबाड लाचलुचपतच्या हाती लागले आहे.

तक्रारदाराच्या पत्नीचे जात प्रमाणपत्र वैध ठरविण्यासाठी उपायुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सदस्य नितीन चंद्रकांत ढगे यांना 1 लाख 90 हजार रुपयांची लाच (Accepting Bribe) घेताना पुणे लाचलुचपत प्रतिबिंधक विभागाच्या (Anti Corruption Bureau Pune) पथकाने शनिवारी रंगेहाथ पकडले होती. ही कारवाई रात्री 9.40 वाजता वानवडी (wanwadi) येथील ढगे यांच्या घराजवळ सापळा रचून करण्यात आली होती या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली होती.

पुणे लाचलुचपत प्रतिबंधक (Anti Corruption Bureau Pune) विभागाने ढगे यांच्या राहत्या घराची रात्रभर झडती घेतली. रविवारी ही झडती संपली. या झडतीत तब्बल पावणे तीन कोटी रुपयांचे घबाड पथकाच्या हाती लागले. यामध्ये रोख एक कोटी 28 लाख 49 हजार रूपयांची रोकड व मालमत्तांची कागदपत्रे मिळून आली. या छापेमारीत एकुण 2 कोटी 81 लाख 89 हजार रुपयांची मालमत्ता मिळून आली आहे. कारवाई दरम्यान आढळून आलेल्या रकमेपैकी किती रक्कम वैध आणि किती रक्कम अवैध आहे याची तपासणी सुरु असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

काय आहे संपूर्ण प्रकरण ?

तक्रारदार यांच्या पत्नीचे जात प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी अर्ज करण्यात आला होता.ते प्रमाणपत्र वैध करण्याकरीता ढगे याने 8 लाख रुपयांची लाच (Anti Corruption Bureau Pune) मागितली. तक्रारदारांनी याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यात ढगे यांनी तडजोड करुन 3 लाख रुपये लाच मागून तडजोडीत 2 लाख रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तक्रारदार यांना ढगे यांनी पैसे देण्यासाठी वानवडीतील आपल्या घराजवळ बोलविले होते.

त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Pune) सापळा रचला. तक्रारदाराकडून प्रत्यक्षात 1 लाख 90 हजार रुपयांची लाच घेताना ढगे यांना पकडण्यात आले. वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली.दरम्यान, नितीन ढगेंची अनेक ठिकाणी बेनामी प्रॉपर्टी असल्याची चर्चा रंगली आहे.

धडाकेबाज कारवाईत ‘यांचा’ होता सहभाग

ही कारवाई पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SB Rajesh Bansode), अप्पर अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav) अप्पर अधीक्षक सुहास नाडगौडा (Addl SP Suhas Nadgauda) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे , पोलीस निरीक्षक संदीप वऱ्हाडे, पो.शि.अंकुश आंबेकर, पो.शि. सौरभ महाशब्दे, चालक पो.शि. चंद्रकांत कदम यांच्या पथकाने केली आहे.

 

Web Title : Pune Anti Corruption Bureau  | 3 crore scam found in the house of corrupt Deputy Commissioner Nitin Chandrakant Dhage in Pune