unidentified man body found on Jamkhed Ashti Highway | जामखेड – आष्टी महामार्गावर आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह   

ओळख पटवण्यासाठी आष्टी पोलिसांशी संपर्क साधावा - पोलिस निरीक्षक सलिम चाऊस

  • ठळक मुद्दे 
  • अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला
  • उडाली मोठी खळबळ
  • आष्टी – जामखेड मार्गावरील घटना

जामखेड टाईम्स वृत्तसेवा :  जामखेड – आष्टी महामार्गावर रविवारी रात्री एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. (unidentified man body found on Jamkhed Ashti Highway)

जामखेड- आष्टी महामार्गावरील पोखरी गावात ही घटना उघडकीस आली. पोखरीत हायवेच्या कडेला एका अनोळखी इसमाचा मृतदेह रविवारी रात्री उशिरा आढळून आला आहे.ही घटना उघडकीस येताच आष्टी तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सलिम चाऊस यांनी आपल्या टीमसह तातडीने घटनास्थळी धाव घेऊन चौकशी सुरू केली आहे. सदर मृत व्यक्तीचे नाव गाव सध्या तरी समोर आलेले नाही.

सदर मयत अनोळखी इसमाची ओळख पटविण्यासाठी आष्टी पोलिस वेगाने तपास करत आहेत. दरम्यान आष्टी मयत अनोळखी इसमाचा फोटो सोशल मिडीयावर जारी केला असुन त्याद्वारे ओळख पटविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

खाली फोटोत दिसत असलेल्या मयत अनोळखी व्यक्तीला कोणी ओळखत असल्यास आष्टीचे पोलिस निरीक्षक सलिम चाऊस ( 8806166100) , पोलिस उपनिरीक्षक काळे ( 8600591754) व पोलिस हवालदार क्षीरसागर (9850907879) यांच्याशी संपर्क साधण्याचे अवाहन आष्टी पोलिसांनी केले आहे.

unidentified man body found on Jamkhed Ashti Highway