Karjat Jamkhed News : कर्जत बंद अंदोलनाच्या आडून राजकारण करणार्यांना जनताच योग्य धडा शिकवणार – सचिन पोटरे यांचा हल्लाबोल
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख : निरव मोदीसह बारामती पुण्याचे उद्योगपती, रोहित पवारांचे निकटवर्तीय यांच्या जागेत MIDC न होता कर्जत तालुक्यातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या जागेत Karjat MIDC होणार आहे.सरकारने कर्जत एमआयडीसीला तत्वता: मान्यता दिली आहे.कोंभळी परिसरात आमदार प्रा.राम शिंदे (Ram shinde) यांच्या पुढाकारातून एमआयडीसी होणार असल्याने तालुक्यातील युवकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.परंतू काही विघ्नसंतोषी व्यापारी राजकारण करू पाहत आहेत.कर्जत बंदच्या आडून राजकारण करणार्यांना जनता योग्य धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे (Sachin Potare) यांनी दिला आहे. (karjat jamkhed news today)
कोंभळी एमआयडीसीला विरोध म्हणून कर्जत बंद करण्यात आले. वारंवार कर्जत बंद ठेवणे कर्जत शहराच्या दृष्टीने हिताचे नाही, चार व्यापाऱ्यांच्या हितासाठी नव्हे तर संपूर्ण कर्जत तालुक्याच्या हितासाठी एमआयडीसी मंजुर करण्यात आली आहे. कोंभळी एमआयडीसीला विरोध म्हणून कर्जत मधील मोजक्या व्यापाऱ्यांनी राजकीय हेतू ठेवून पुकारलेल्या कर्जत बंदला इतर व्यापाऱ्यांनी विरोध केल्याने कर्जत बंदचा फज्जा उडाला. कर्जत बंदचे अंदोलन फसले.व्यापारी संघटनेत फुट पडल्याचे यानिमित्ताने उघड झाले.कर्जत बंदला अतिशय संमिश्र प्रतिसाद मिळाला, असे सचिन पोटरे म्हणाले. (Karjat Jamkhed news)
कर्जत तालुक्यात एमआयडीसी मंजुर व्हावी अशी गेल्या अनेक वर्षांची मागणी होती. सिध्दटेक भागात midc मंजुरीसाठी आमदार प्रा.राम शिंदे यांनी मंत्री असताना प्रयत्न सुरू केले होते. त्यानंतर पाटेगा खंडाळा भागात midc व्हावी यासाठी रोहित पवारांनी घाट घातला. या भागात निरव मोदी आणि पुणे मुंबई येथील उद्योगपती व रोहित पवारांच्या निकटवर्तीयांच्या जमिनी होत्या.त्यामुळे याच भागात एमआयडीसी व्हावी अशी रोहित पवारांची इच्छा होती. परंतू स्थानिक शेतकऱ्यांचा या एमआयडीला विरोध होता. शासकीय नियमानुसार येथील जागाही योग्य नव्हती. देशाला फसवणाऱ्या निरव मोदीच्या जागेत एमआयडीसी करण्याचा डाव आमदार प्रा.राम शिंदे यांनी हाणून पाडला.
आमदार प्रा.राम शिंदे यांच्याच प्रयत्नातून महायुती सरकारने कोंभळी भागातील एमआयडीसीला तत्वता: मंजुरी दिली आहे. MIDC कर्जत तालुक्यातच होत आहे. ती इतर तालुक्यामध्ये स्थलांतरीत झालेली नाही किंवा रद्द झालेली नाही. एमआयडीसी मंजुरीचा कर्जत तालुक्यातील जनतेला विशेषता युवावर्गाला मोठा आनंद झालेला आहे. या एमआयडीसीचा फायदा दोन चार व्यापाऱ्यांना न होता संपुर्ण तालुक्याला होणार आहे. एमआयडीसीला विरोध करणारे युवा वर्गाच्या स्वप्नांना विरोध करत आहेत. राजकीय हेतू ठेवून वारंवार कर्जत बंद ठेवणाऱ्यांना तालुक्यातील जनता योग्य धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा सचिन पोटरे यांनी दिला आहे.
गोरगरिब शेतकऱ्यांच्या जागेत एमआयडीसी होऊ नये अशी ‘त्या’ व्यापाऱ्यांची इच्छा आहे का ? सचिन पोटरे यांचा संतप्त सवाल
कर्जत शहराच्या जवळ midc व्हावी अशी राजकीय फुस मोजक्या व्यापाऱ्यांना लावली जात आहे. वारंवार कर्जत बंदचे अंदोलन होत असल्याने व्यापारी वर्ग वैतागला आहे. जनतेची ससेहोलपट होत आहे.कर्जत बंद ठेवण्याचे अंदोलन करण्यासाठी दोन चार व्यापारी उठतात सोशल.मीडियावर पोस्ट टाकतात.वास्तविक कर्जत बंदचे अंदोलन करण्यासाठी सर्व व्यापाऱ्यांचे मत विचारात घेतले जात नाही. ज्या ग्रुपवर पोस्ट टाकली. तिथे व्यापाऱ्यांनी आपली मते मांडू नयेत यासाठी ग्रुपला लाॅक करण्यात आले. त्या ग्रुपवरची पोस्ट इतर ग्रुपवर वायरल करण्यात आली. राजकीय हेतूने प्रेरित मोजक्या व्यापाऱ्यांनी कर्जत बंदचा घाट घातला. कर्जत तालुक्यात midc होऊ नये अशीच इच्छा या व्यापाऱ्यांची आहे का ? गोर गरिब शेतकऱ्यांच्या जागेत midc होऊ नये यासाठी मोजके व्यापारी कर्जत बंदचे अंदोलन करत आहेत का ? असा सवाल यावेळी सचिन पोटरे यांनी उपस्थित केला आहे.
सचिन पोटरे यांनी लिहिलेल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलय ?
कर्जत बंद – चारच व्यापारी अचानक ठरवून राजकीय हेतूने सोशल मीडियाला कर्जत बंदची पोस्ट टाकतात. त्यावर इतर व्यापाऱ्यांची मते मतांतरे न होता त्या ग्रुपला लॉक करतात व इतर सर्व ग्रुपवर पोस्ट व्हायरल करतात. मग सर्वसामान्य छोटे मोठे व्यापारी, शेतकरी,हॉटेल व्यावसायिक, सर्वसामान्य कामासाठी तालुक्यात आलेल्या जनतेची ससेहोलपट होते.
MIDC कर्जत तालुक्यातच होत आहे. ती इतर तालुक्यामध्ये गेली नाही किंवा रद्द ही झाली नाही. त्यामुळे कर्जत शहरालाही याचा फायदा होणारच आहे. त्यामुळे मान्यतेचा आनंद तालुक्यातील सर्व जनतेला व तरुणांना झालाच आहे.
परंतु महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाच्या निर्देशानुसार या जागेला भुनिवड समितीने गुगल मॅप तसेच सॅटेलाईट च्या माध्यमातून रीतसर नियमाने स्थळ पाहणी अहवाल तयार करूनच या जागेची निवड केली आहे.
निरव मोदी, बारामती ,पुण्याचे मोठे व्यापारी , उधोगपती व लोकप्रतिनिधीच्या निकटवर्तीय यांनी खरेदी केलेल्या जागेत ठरवून झालेल्या MIDCमध्ये ना शेतकऱ्यांचा फायदा, ना येथील सुशिक्षित बेरोजगारांचा फायदा झाला असता.
कोणाला तरी बाहेरच्या भ्रष्टाचारामुळे ED ची नोटीस आली, कुठला तरी कारखाना जप्त झाला, कुणावर तरी कारवाई झाली तरी त्याचे पडसाद आपल्या सर्वसामान्य व्यापारी, जनतेवर होतोय.. कर्जत बंद ला हरकत नाही परंतु तसे कारण हवे, राजकारण नको. त्यामुळे सर्वसमावेशक व्यापारी बंधूंनी एकत्र यावं, कर्जत बंदवर चर्चा झालीच पाहिजे.
तालुक्याची प्रगती होत असताना प्रत्येक विकास घटकांचा फायदा व्यापारी ,सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचतच असतो.
पुराणकाळात देव दानवांच्या युद्धात समुद्रमंथन होऊन ज्या प्रमाणे अमृत बाहेर पडले त्या प्रमाणेच तालुक्यातील अनेक विकासकामांच्या प्रश्नांवर विरोधक आणि सत्ताधारी यांची अशी वेगवेगळे मत मतांतरे च्या माध्यमातून मंथन होऊन विकासकामांची गंगा जनतेपर्यंत नक्कीच पोहचेल.
कारण, एकीकडे भुलभुलैय्या, नौटंकी, अपरिपक्व बालिश परंतु #मायावी_शक्ती आणि एकीकडे जनतेची नाळ ओळखणारा आणि विकासाचा समतोल राखून दूरदृष्टीने विकास करणारा भूमिपुत्र आहे.
सचिन पोटरे –
जिल्हा सरचिटणीस भाजपा अहिल्यानगर दक्षिण.