जामखेड : आंतरराष्ट्रीय काजवा वर्गीकरण कार्यशाळेसाठी महाराष्ट्रातून फक्राबादच्या रणजित राऊत या संशोधक विद्यार्थ्याचा सक्रिय सहभाग !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख : बंगळुरू येथील पर्यावरण व्यवस्थापन आणि संशोधन संस्था, इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर, फायरफ्लाइज एसियन असोसिएशन, स्पेसिज स्पेशालिस्ट ग्रुप व मोनॅश विद्यापीठ मलेशिया यांच्या संयुक्त विद्यमाने कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर, गांधी कृषी विज्ञान केंद्र बंगळुरू (Bangalore) येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय काजवा वर्गीकरण कार्यशाळेमध्ये (International Kajawa Taxonomy Workshop) जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथील संशोधक विद्यार्थी रणजित रावसाहेब राऊत (Ranjit Raut) याने सक्रिय सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे महाराष्ट्रातून (Maharashtra) निवड झालेला तो एकमेव विद्यार्थी होता.

Active participation of research student Ranjit Raut of Maharashtra in Bangalore International Kajawa Taxonomy Workshop

बंगळुरू येथील पर्यावरण व्यवस्थापन आणि संशोधन संस्था, इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर, फायरफ्लाइज एसियन असोसिएशन, स्पेसिज स्पेशालिस्ट ग्रुप व मोनॅश विद्यापीठ मलेशिया यांच्या संयुक्त विद्यमाने कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर, गांधी कृषी विज्ञान केंद्र बंगळुरू येथे ९ मार्च ते १२ मार्च या कालावधीत आंतरराष्ट्रीय काजवा वर्गीकरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या आंतरराष्ट्रीय काजवा वर्गीकरण कार्यशाळेमध्ये जम्मु काश्मीर, कोलकाता, केरळ, तामिळनाडू, छत्तीसगढ, उडीसा, दिल्ली, महाराष्ट्र इत्यादी विविध राज्यांमधून १२ प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात आली होती. त्यापैकी महाराष्ट्रातून छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित अंबाजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागातील संशोधक विद्यार्थी व फक्राबादचे सुपुत्र रणजित रावसाहेब राऊत याची निवड करण्यात आली होती. रणजित राऊत याने ४ दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वीरित्या पूर्ण केली. त्याला अधिष्ठाता प्रा. डॉ. जी. एस. के. स्वामी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवुन सन्मानित करण्यात आले.

Active participation of research student Ranjit Raut of Maharashtra in Bangalore International Kajawa Taxonomy Workshop

या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण कार्यशाळेत डॉ. लेस्ली बॅलेंटाईन (ऑस्ट्रेलिया), डॉ. वान जुसोह (मलेशिया), डॉ. अक्षय कुमार चक्रवर्ती, डॉ. प्रकाश (बंगळुरू) या वरिष्ठ शास्त्रज्ञांनी काजव्यांच्या विविध प्रजातींची ओळख व माहिती याबद्दल मार्गदर्शन केले. या संशोधन प्रशिक्षणामध्ये काजव्यांचे जीवसृष्टी व पर्यावरण समतोल राखण्यासाठी असलेले उपयुक्त योगदान व त्यांच्या संवर्धनाची आवश्यकता यावर सखोल चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्रदूषण व मानवी हस्तक्षेपामुळे काजाव्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे, म्हणून त्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी योग्य त्या उपाययोजना सुचविण्यात आल्या.

जैवविविधता संरक्षण व संवर्धनासाठी रणजित राऊत हे नेहमीच प्रयत्नशील असतात. या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी त्यांना शास्त्रज्ञ डॉ. विश्वास चव्हाण, प्राणीशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. गणेश सूर्यवंशी, प्राचार्य डॉ. विश्वास साखरे, प्रा. डॉ. अनिल कुऱ्हे, प्रा. डॉ. अशोक भोसले, प्रा. डॉ. संतोष रणखांब, प्रा. डॉ. रुपेंद्र भागडे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

काजवा महोत्सवाचे दुष्परीणाम

काजवा महोत्सवाबद्दल बोलताना रणजित राऊत म्हणाले, वनक्षेत्रात काजवा महोत्सव केल्यामुळे जैववीवीधतेला हानी पोहचून, पर्यावरणाचा समतोल बिघडू शकतो.तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार मे महीन्याचा दूसरा आठवडा आणि जुनचा पहिला आठवडा हा काज‌व्यांच्या मिलन आणि प्रजननाचा असतो, पर्यटकांच्या मोठ्या संख्येमुळे काजव्यांच्या जीवनचक्र व प्रजनन चक्रावर विपरीत परिणाम होऊ शकतो.रात्रीच्या वेळी टॉर्च लाईट, फ्लॅश लाईट एलईडी बल्ब यामधुन निघनारा प्रकाश, हायमॅक्स दिवे, कॅमेरे तसेच मोठ्या आवाजातील संगीत आणि गोंगाट यांमुळे काजव्यांच्या वीण विधीमध्ये अडथळा निर्माण होतो. मादी काजवा जमीनीवर अंडी ठेवतात. अंड्यांमधून लहान आळ्या बाहेर पडतात ज्यापासून पुढे प्रौढ काजवे विकसीत होतात. जर पर्यटकांनी अशा प्रजनन केंद्रांच्या ठिकाणी मोठ्या संखेने भेट दिली तर अंडी, अळ्या आणि अंडी घालणाऱ्या काजव्यांच्या माद्या पायदळी तुडविण्याची शक्यता वाढते. यामुळे काजव्याच्या संख्येत घट झाली आहे.

shital collection jamkhed

काजव्यांबद्दल लोकांमध्ये जागरुकता पसरवीने चांगले आहे, परंतु पर्यटन किंवा उत्सवांच्या नावाखाली नैसर्गिक जैवविविधता नष्ट करणे थांबले पाहिजे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी काजवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. जे काजव्यांसाठी तसेच जैवविविधतेच्या विविध घटकांसाठी हानिकारक आहेत. भंडारदरा धरण, हरिश्चंद्रगड कळसुबाई वनपरिक्षेत्र, घाटघर धरण, इगतपुरी, राधानगरी वन्यजीव अभयारण्य, लोणावळा नानेघाट याठिकाणी पैश्यांच्या हव्यासापोटी, निसर्ग व जैव‌विविधता नष्ट होत आहे. महाराष्ट्राला लाभलेल्या जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन करने हि प्रत्येक नागरीकाची जबाबदारी आणि कर्तव्य आहे.

काजव्यांच्या संख्येत घट.

गेल्या काही वर्षापासून काजव्यांची संख्या कमी होत आहे आणि याचा अप्रत्यक्ष परीणाम काजव्यांच्या आळ्या खात असलेल्या गवतांवर तसेच काजव्यांना खाणाऱ्या इतर भक्षकावर देखील झाला आहे अशाप्रकारे संपूर्ण – अन्नसाखळी विस्कळीत झाली आहे .बदलते हवामान, पावसाचे स्वरूप, जंगलतोड, जागतीक तापमान वाढ, प्रकाशाचे प्रदुषण, विविध बाबी काजव्यांच्या संख्येत घट होण्यास कारणीभूत आहेत.

काजवे कसे चमकतात.

काजवा या किटकांच्या पोटाखाली प्रकाशाचे अवयव असतात. काजवे ऑक्सीजन घेतात आणि विशेष पेशींच्या आत ते ल्युसिफेरीन नावाच्या पदार्थासह एकत्र करतात आणि जवळजवळ उष्णता नसताना प्रकाश निर्माण करतात आणि चमकतात या प्रक्रियेला बायोल्युमीनेसन्स म्हणतात.

काजव्यांच्या दोन हजार प्रजाती.

संशोधकांच्या मते जगभरात 2000 पेक्षा जास्त काजव्यांच्या प्रजाती आढळतात.काजव्यांच्या अनेक प्रजाती आहेत. आणि ते अधून मधून प्रकाश निर्मान करतात.प्रकाश हा प्रत्येक प्रजातीसाठी अद्वितीय असलेल्या विविध नमुन्यांमध्ये चमकतो. प्रत्येक ब्लिंकींग पॅटर्न का एक ऑप्टीकल सिग्नल असतो. जो काजव्याला त्यांचे, संभाव्य जोडीदार शोधण्यास मदत करतो