जामखेड टाइम्स वृत्तसेवा : इंदौर येथील होळकर राजघराण्याकडून गेल्या 250 वर्षांपेक्षा अधिक काळापासून देशातील 12 ज्योतिर्लिंगे आणि पंढरपुरातील विठ्ठल मुर्तीवर महाशिवरात्रीनिमित्त गंगेच्या पाण्याचा (गंगाजल) महाअभिषेक केला जातो. यंदा होणाऱ्या महाअभिषेक सोहळा आणि विठ्ठल पुजेचा मान कर्जत-जामखेडचे भाग्यविधाते आमदार प्रा राम शिंदे आणि त्यांच्या सौभाग्यवती आशाताई राम शिंदे यांना मिळाला आहे. येत्या 18 फेब्रुवारी 2023 रोजी पंढरीच्या विठ्ठल मंदिरात हा कार्यक्रम पार पडणार आहे, अशी माहिती होळकर ट्रस्टचे पंढरपूर येथील व्यवस्थापक आदित्य फत्तेपुरकर यांनी दिली.
इंदौर येथील होळकर राजघराण्याकडून गेल्या 250 वर्षांपेक्षा अधिक काळापासून देशातील 12 ज्योतिर्लिंगे आणि पंढरपुरातील विठ्ठल मुर्तीची महाशिवरात्रीनिमित्त महापूजा केली जाते.यासाठी इंदोर येथील होळकर ट्रस्टच्या वतीने गंगेचे उगमस्थान असलेल्या गंगोत्री येथून पवित्र गंगाजल आणले जाते. या पवित्र गंगाजलाचा 12 ज्योतिर्लिंगे आणि पंढरपूर येथील विठ्ठल मूर्तीवर महाशिवरात्रीदिवशी रात्री 12 वाजता अभिषेक केला जातो. तसेच महापूजा केली जाते. पंढरपुर येथील विठ्ठल मूर्तीवर महाशिवरात्री दिवशी बेल वाहिले जाते. कारण विठ्ठलाच्या डोक्यावर महादेवाची पिंड आहे. विठ्ठलाला शैव वैष्णवाचं प्रतिक मानलं जातं.आषाढी एकादशीला विठ्ठलाची जशी महापूजा असते तशीच महापुजा महाशिवरात्री दिवशी केली जाते.या महापुजेसाठीचे सर्व साहित्य होळकर ट्रस्टकडून दिले जाते.
प्रतिवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त रात्री बारा वाजता गंगेच्या पाण्याचा (गंगाजल) महा अभिषेक सोहळा यंदा 18 फेब्रुवारी रोजी होणार आहे. यावेळी होणाऱ्या महा अभिषेक आणि महापुजेचा मान कर्जत-जामखेडचे भाग्यविधाते आमदार प्रा राम शिंदे आणि त्यांच्या सौभाग्यवती आशाताई राम शिंदे यांना मिळाला आहे. इंदौरच्या होळकर ट्रस्टच्या वतीने त्यांना हा मान देण्यात आला आहे. विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासमवेत शिंदे दाम्पत्याच्या हस्ते महाअभिषेक आणि महापूजा होणार आहे, अशी माहिती होळकर ट्रस्टचे व्यवस्थापक आदित्य फत्तेपुरकर यांनी दिली.