जामखेड : ज्योती क्रांती पतसंस्थेच्या चेक बाऊन्स प्रकरणी एकास जामखेड न्यायालयाने सुनावली तीन महिन्यांची शिक्षा !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । ज्योती क्रांती पतसंस्थेच्या चेक बाऊन्स प्रकरणी जामखेड तालुक्यातील नान्नज येथील एकास तीन महिन्याचा कारावास व एक लाख छत्तीस हजाराचा दंड ठोठावण्याचा महत्वपूर्ण निकाल जामखेड न्यायालयाने दिला आहे.
याबाबत सविस्तर असे की, नान्नज येथील ज्योती क्रांती पतसंस्थेच्या शाखेतून कांतीलाल बाजीराव मोहोळकर यांनी पतसंस्थेचे देणे लागत असलेली 85 हजार रूपये करिता चेक दिला होता. तो वठला नव्हता. त्यामुळे पतसंस्थेने त्यांच्याविरुद्ध 2015 मध्ये जामखेड न्यायालयात चेकची केस दाखल केली होती. सदर केसमध्ये साक्ष पुरावे होऊन 10 फेब्रुवारी 2023 रोजी जामखेड न्यायालयाने निकाल सुनावला आहे.
या निकालात कांतीलाल मोहळकर हे दोषी आढळुन आले आहेत. जामखेड न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार मोहळकर यांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावण्याबरोबरच एक लाख छत्तीस हजार रूपयांचा दंड सुनावण्यात आला आहे. सदर फिर्यादी संस्थेच्या वतीने ॲड. आर.ई.काळे यांनी काम पाहिले व त्यांना सहकार्य ॲड.रोहित काळे यांनी केले व सदर फिर्यादी पतसंस्थेच्या वतीने माहितगार इसम म्हणून सुभाष तोलाजी गायकवाड यांनी काम पाहिले व त्यांना हर्षवर्धन पुरुषोत्तम वाळुंजकर यांनी सहकार्य केले.