Omicron patients found Pimpari Chinchawad Pune Kalyan Dombivali | कल्याण – डोंबिवलीनंतर पुणे पिंपरी चिंचवडमध्ये ओमिक्रॉनचा शिरकाव ; महाराष्ट्राचे टेन्शन वाढले

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Omicron patients found Pimpari Chinchawad Pune Kalyan Dombivali | महाराष्ट्रात ओमिक्रॉन या कोरोना विषाणूने महाराष्ट्राचे टेन्शन वाढवले आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर रविवारी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

दोन्ही शहरांमध्ये रविवारी 7 नवे रूग्ण आढळून आले आहेत.त्यानुसार महाराष्ट्रातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या आता 8 झाल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. (Omicron patients found Pimpari Chinchawad Pune Kalyan Dombivali)

आरोग्य विभागाने जारी केलेल्या माहिती नुसार पुणे शहरात 01 तर पिंपरी चिंचवडमध्ये 6 जणांना ओमिक्रॉन कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.पिंपरीतील सहा जणांपैकी 3 जण नायजेरियाहून आले आहेत. तर इतर तिघे त्यांचे संपर्कातील आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

पुणे शहरातील 47 वर्षीय पुरूषाला या नवीन व्हेरियंटचा संसर्ग झाल्याचे नॅशनल केमिकल लॅबोरेटरीच्या अहवालाने सिध्द झाले आहे. पिंपरीमधील सहाही रुग्ण एकाच कुटूंबातील आहे. नायजेरिया देशातील लेगॉस शहरातून 44 वर्षीय महिला तिच्या भावाला पिंपरी चिंचवडला भेटण्यासाठी आली होती.

तिच्या सोबत आलेल्या दोन मुली आणि पिंपरी चिंचवड शहरात राहणारा तिचा भाऊ यासह त्याच्या दोन्ही मुली असे एकूण 6 जणांच्या प्रयोगशाळा नमुन्यामध्ये ओमायक्रॉन विषाणू सापडल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने रविवारी संध्याकाळी दिला आहे.

नायजेरियाहून आलेल्या महिलेची आजाराची लक्षणे अत्यंत सौम्य असून इतर 5 जणांना कसलीही लक्षणे नाहीत. हे सर्व रुग्ण सध्या पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयात भरती असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

नायजेरियाची नागरिक असणारी भारतीय वंशाची 44 वर्षांची महिला तिच्या 12 आणि 18 वर्षांच्या दोन मुलींसह आपल्या भावाला भेटण्यासाठी दिनांक 24 नोव्हेंबर 2021 रोजी पिंपरी चिंचवड येथे आली. त्या तिघींना ओमायक्रॉन विषाणूची बाधा असल्याचे आता सिध्द झाले आहे.

या तिघींच्या 13 निकटसहवासितांची तपासणी करण्यात आली असून त्यातील या महिलेचा 45 वर्षाचा भाऊ आणि त्याच्या अनुक्रमे दीड वर्षे आणि 7 वर्षांच्या दोन मुली या कोविड बाधित आल्या होत्या.