मुंबई : आमदार प्रा राम शिंदे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट, भेटीचं कारण काय ? वाचा सविस्तर

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । राज्याचे माजी मंत्री तथा कर्जत जामखेडचे भाग्यविधाते आमदार प्रा.राम शिंदे (Ram Shinde) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची मुंबईतील वर्षा बंगल्यावर (Varsha Bungalow Mumbai) भेट घेतली.आमदार राम शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट का घेतली असेल ? याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली असताना भेटीचे कारण आता समोर आले आहे.

MLA Pra Ram Shinde met Chief Minister Eknath Shinde, what was the reason for the meeting? Read in detail

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या श्रीक्षेत्र चोंडी (Chondi) येथे दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ( Punyashlok Ahilya Devi Holkar Jayanti 2023) यांचा जयंती सोहळा मोठा उत्साहात साजरा केला जातो. या जयंती सोहळ्यासाठी देशभरातील अहिल्याभक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी हजेरी लावत असतात.

यंदा होणारा 298 वा जयंती सोहळा आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहे.यंदाचा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा व्हावा यासाठी जयंती उत्सव समितीने जय्यत तयारी हाती घेतली आहे. यंदाच्या जयंती सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Union Minister Jyotiraditya Cindia)यांना निमंत्रित करण्यात आले आहे. आमदार प्रा राम शिंदे यांनी नुकतीच शिंदे यांची दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन जयंती सोहळ्याचे निमंत्रण दिले.

MLA Pra Ram Shinde met Chief Minister Eknath Shinde, what was the reason for the meeting? Read in detail

दिल्लीहून मुंबईला परतलेल्या आमदार प्रा.राम शिंदे (MLA Ram Shinde) यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shindd)यांची मुंबईतील वर्षा बंगल्यावर भेट घेतली. या भेटीत आमदार शिंदे यांनी 31 मे 2023 रोजी साजऱ्या होणाऱ्या जयंती सोहळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निमंत्रण दिले. 31 मे 2023 रोजी होणाऱ्या जयंती सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचा शब्द यावेळी मुख्यमंत्र्यांनी आमदार शिंदे यांना यावेळी दिला.

MLA Pra Ram Shinde met Chief Minister Eknath Shinde, what was the reason for the meeting? Read in detail

यंदा जामखेड तालुक्यातील चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. कोरोना महामारीनंतर यंदा होणाऱ्या जयंती सोहळ्यासाठी देशभरातील अहिल्याभक्त यंदा मोठ्या संख्येने हजेरी लावणार आहे. यंदा होणाऱ्या सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच इतर विशेष मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

MLA Pra Ram Shinde met Chief Minister Eknath Shinde, what was the reason for the meeting? Read in detail

इंदोरच्या होळकर संस्थानचे वंशज महाराज श्रीमंत राजे यशवंतराव होळकर (तृतीय) (Descendants of the Holkar Sansthan of Indore Maharaja Shrimant Raje Yashwantrao Holkar (III) ) यांची आमदार प्रा.राम शिंदे यांनी भेट घेऊन श्री क्षेत्र चोंडी येथे ३१ मे २०२३ रोजी होत असलेल्या “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीचे विशेष उपस्थिती करीता निमंत्रण दिले आहे.