जामखेड : रत्नापुरकरांकडून जामखेड बाजार समितीचे सभापती शरद कार्ले आणि संचालकांचा नागरी सत्कार संपन्न !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेड बाजार समितीच्या सभापतीपदी शरद कार्ले यांची निवड झाल्याबद्दल तसेच भाजपच्या नवनिर्वाचित बाजार समिती संचालकांचा रत्नापुर ग्रामस्थ व भाजपच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

Jamkhed market Committee Chairman Sharad Karle and Director were felicitated by Ratnapur villagers

यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाकरे महाराज होते. यावेळी जामखेड बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, संचालक गौत्तम उत्तेकर, संचालक विष्णू भोंडवे, संचालक डाॅ गणेश जगताप, संचालक नंदकुमार गोरे, भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, पंचायत समिती सदस्य भगवान मुरुमकर, सरचिटणीस लहू शिंदे सह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी रत्नापुर ग्रामस्थ भाजपच्या कार्यकर्त्यांनी जामखेड बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती शरद कार्ले व नवनिर्वाचित संचालकांचा यथोचित सन्मान केला. बाजार समितीच्या माध्यमांतून शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याची ग्वाही यावेळी सभापती शरद कार्ले यांनी दिली.

यावेळी रत्नापुरचे माजी सरपंच दादा बापु वारे, ग्रामपंचायत सदस्य अशोक मोरे, पाटोदा सोसायटीचे चेअरमन अशोक महारनवर, माजी चेअरमन निवृत्ती महारनवर, दिनकर टापरे, सुहास वारे, सोमनाथ दरे, पिंटू वस्ताद माने, शरद मोरे, उध्दव ढवळे, बाळासाहेब ढवळे, आप्पासाहेब ढमढेरे, दत्तात्रय गिरी, शैलेश कदम, अमोल कदम, दत्ता गंभिरे, पांडुरंग मोरे, विलास मोरे, उमेश मोरे, विकास मोरे, सुनिल वारे, राजु वारे, स्वप्निल वारे, अशोक राळेभात, शंकर वारे , संजय वारे, बबन नलवडे, किरण वराडे, गोरख राजगुरु, प्रमोद मोरे, मच्छिंद्र भोसले, सुनिल जाधव, आकाश जाधव, राजेंद्र नलवडे, किशोर माळी, किरण वारे, रविंद्र वारे शौकत शेख, सचिन महारनवर, राम साळवे, सह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.