new forecast on Sunday Warning of heavy rain | पुढील तीन ते चार तासांत अतिवृष्टीचा इशारा : हवामान विभागाकडून रविवारी नवा अंदाज जारी

जामखेड तालुक्यात रविवारी दुपारपासुन पाऊस सुरू

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : new forecast on Sunday Warning of heavy rain | जामखेड तालुक्यात रविवारी दुपारपासुन काही भागात विजांचा गडगडाट सुरू झाला असून काही भागात पाऊस सुरू झाला आहे. पुढील तीन ते चार तासांत अहमदनगर जिल्ह्यात जोरदार वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने जारी केला आहे.Meteorological Department released new forecast on Sunday Warning of heavy rain in the next three to four hours

हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के एस होसळीकर यांनी  ट्विट करत मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे.

शनिवारी अहमदनगर शहराला तुफान पावसाने झोडपून काढले होते. तसेच जिल्ह्यातील इतर भागातही पावसाने हजेरी लावली होती.

शनिवारी दुपारी जामखेड तालुक्यातील पिंपळगाव आळवा गावात विज कोसळून एक बैल ठार होण्याची दुर्घटना समोर आली होती.

तर आज रविवारी दुपारपासून जामखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आभाळ  येऊन विजांचा कडकडाट सुरू झाला आहे.

काही भागात पाऊस झाल्याचे वृत्त आहे. नागरिकांनी विजांचा कडकडाट सुरू असताना घराबाहेर पडू नये. झाडाखाली थांबू नये असे अवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान रविवारी दुपारी हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने शास्त्रज्ञ के एस होसळीकर यांनी यासंबंधी ट्विटरवर माहिती दिली आहे.

हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार अहमदनगर, औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, पुणे, सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांमध्ये पुढील तीन ते चार तासांत वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस होण्याचा इशारा जारी करण्यात आला आहे.

जामखेड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत आहे. विशेषता: बालाघाट डोंगर परिसरातील गावांमध्ये पावसाने प्रमाण जास्त आहे. या भागातील पिके पार वाया गेले आहे. तसेच तालुक्यातील अनेक गावांमधील शेतात पाणी आहे.

जामखेड सह अहमदनगर जिल्ह्यासाठी पुढील तीन ते चार तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा देण्यात आला असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे अवाहन प्रशासनाने केले आहे.

Meteorological Department released new forecast on Sunday Warning of heavy rain in the next three to four hours