Jagdamba Devi temple | भाविकांसाठी ई पासची सुविधा सुरु : राशीनच्या जगदंबा देवी मंदीर परिसरात गर्दी टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने उभारली दर्शनबारी

जामखेड टाईम्स वृत्तसेवा (कर्जत बातमीदार) : सध्या राज्यातील सर्व मंदिरे भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत.नवरात्रौत्सव (Navratri festival 2021) काळात राशीनच्या जगदंबा देवी मंदिरात (Jagdamba Devi temple​​ Rashin) मोठी गर्दी असते. कोरोनाच्या पार्श्वभूमवीर यंदा साजरा होत असलेल्या नवरात्रौत्सव काळात गर्दीवर नियंत्रण राहण्याबरोबर कोरोना नियमांचे पालन होण्याकरिता कर्जत पोलिस प्रशासनाच्या(Karjat Police Administration) वतीने मंदिर परिसरात दर्शनबारी उभारण्यात आली आहे. Darshanbari was set up by the police administration in the Jagdamba Devi temple area of ​​Rashin E-pass facility started for devotees

कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी नवरात्रौत्सव काळात सुलभ दर्शन पार पडावे यासाठी बांबूच्या साह्याने दर्शनबारी उभारत भाविकांना रांगेत जाण्याची व्यवस्था केली आहे. या निर्णयामुळे गर्दीवर अंकुश लागणार आहे. तसेच कोरोना नियमांचेही पालन होण्यास मदत होणार आहे.

नवरात्र उत्सवात राशीन येथील जगदंबा देवीचा उत्सव राज्यात प्रसिद्ध आहे. मागील वर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार राशीन जगदंबा देवीचा उत्सव स्थगित करण्यात आला होता. मात्र यंदा कोरोना रुग्णाची संख्या कमी असल्याने कोरोनाचे नियम पुरेपुर पाळत सामाजिक अंतर ठेवत दर्शन करण्याची मुभा देण्यात आली आहे.याच पार्श्वभूमीवर कर्जत प्रशासनाने स्थानिक सेवेकरी, पुजारी, मानकरी आणि ग्रामस्थांशी चर्चा करीत उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Jagdamba Devi temple | Darshanbari was set up by the police administration in the Jagdamba Devi temple area of ​​Rashin E-pass facility started for devotees

भाविक-भक्तांना जगदंबा देवीचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी स्थानिक उत्सव कमिटीच्या मदतीने मंदिर परिसरात बांबूच्या साह्याने दर्शनबारी उभारली. दर्शनासाठी आत येण्याचा आणि दर्शन घेवून बाहेर पडण्याचा स्वतंत्र मार्ग करण्यात आला आहे. कुठेही गर्दी होणार नाही यासह दर्शन घेताना व्यत्यय येणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे.

अवघ्या कमी वेळात भाविकांना सहज दर्शन मिळत असल्याने भाविक देखील पोलीस प्रशासनास सहकार्य करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. रविवारी ललितपंचमी असल्याने देवीच्या दर्शनासाठी मंदिरात मोठ्या संख्येने भाविक राशीनमध्ये दाखल होतील यासाठी शनिवार, दि ९ रोजी संध्याकाळी पाच वाजता पोलीस निरीक्षक यादव यांनी मंदिर परिसराची पाहणी करत दर्शनबारीतून दर्शन घेत सर्वसामान्य भाविकांना प्रात्यक्षिक दाखवले. तदनंतर बंदोबस्तावर असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांशी सवांद साधत सुचना केल्या. यावेळी पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, प्रसाद मुंडे, गुप्तवार्ताचे मनोज लातूरकर आदी उपस्थित होते.

जगदंबा देवीचे दर्शन इ पास द्वारे

वाढती गर्दी लक्षात घेता यंदा प्रथमच स्थानिक उत्सव कमिटी आणि पोलीस प्रशासनाच्या साह्याने राशीन जगदंबा देवीचे इ पासद्वारे दर्शन घेता येणार आहे.यासाठी onlinepass या लिंकमार्फत ऑनलाइन पास घेवू शकतात. दररोज फक्त पाच हजार भाविकच दर्शन घेतील. दर्शनासाठी येताना भाविकांनी कोरोनाचे नियम पाळत दर्शन पार पाडावे यासह पोलीस प्रशासनाने दिलेले नियम पाळावे असे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले.

कर्जत पोलिसांचा कौतुकास्पद उपक्रम

राशीन येथील जगदंबा देवीचा उत्सव राज्यात प्रसिद्ध असल्याने भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात. यंदा दर्शनसाठी कर्जत पोलिसांनी चोख व्यवस्था ठेवली आहे. दर्शनबारी उभारल्याने आम्हाला सहज दर्शन मिळत आहे. कुठे ही धक्का-बुक्की, चेंगराचेंगरी या दर्शनबारीमुळे झाली नाही अथवा पुढे देखील होणार नाही. कर्जत पोलिसांचा हा उपक्रम निश्चित कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया दर्शनास आलेल्या भाविकांनी पत्रकारांना दिली.

 

web titel : Jagdamba Devi temple | Darshanbari was set up by the police administration in the Jagdamba Devi temple area of ​​Rashin E-pass facility started for devotees