कर्जत: जखमी रूग्णाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लाखाची आर्थिक मदत, आमदार प्रा.राम शिंदे यांनी घेतली बिटकेवाडीतील रूग्णाची भेट,काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। पायाला मार लागून अपघातात गंभीर झालेल्या कर्जत तालुक्यातील बिटकेवाडी येथील चैतन्य बाबासाहेब बिटके या रूग्णास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लाख रूपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. या रूग्णाच्या मदतीसाठी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या कार्यालयाकडून पाठपुरावा करण्यात आला होता.

Karjat, financial assistance of one lakh from Chief Minister's Assistance Fund to injured patient, MLA Ram Shinde visited patient in Bitkewadi, don't worry I am with you,

कर्जत तालुक्यातील बिटकेवाडी येथील चैतन्य बाबासाहेब बिटके या 15 वर्षीय मुलाचा पाडव्याच्या आदल्या दिवशी मोटारसायकल अपघात झाला होता. या अपघातात त्याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. सदर रूग्णावर पुण्यातील संचेती हाॅस्पीटलमध्ये उपचार करण्यात आले. पायावरील शस्त्रक्रियेसाठी लाखो रूपयांचा खर्च येणार होता.बिटके यांची घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने हा खर्च भागवायचा कसा असा प्रश्न चैतन्यच्या आई वडिलांसमोर उभा ठाकला होता.

Karjat, financial assistance of one lakh from Chief Minister's Assistance Fund to injured patient, MLA Ram Shinde visited patient in Bitkewadi, don't worry I am with you,

बिटके परिवारावर अचानक ओढवलेल्या या संकटाची माहिती माजी सरपंच दादासाहेब बिटके यांनी आमदार प्रा.राम शिंदे यांना कळवली होती.आमदार प्रा.राम शिंदे यांनी तातडीने याची दखल घेतली.पुण्यातील संचेती हाॅस्पीटलमध्ये सदर रूग्णास अ‍ॅडमिट करण्यापासून ते डिस्चार्ज मिळेपर्यंत आमदार राम शिंदे स्वता: जातीने लक्ष ठेऊन होते.सदर रूग्णासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत व्हावी यासाठी शिंदे यांनी आपल्या कार्यालयाला पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करण्याच्या सुचना केल्या होत्या.त्यानुसार आमदार शिंदे यांच्या कार्यालयाकडून तातडीने पाठपुरावा करण्यात आला आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून चैतन्य बिटके या रूग्णास एक लाख रूपयांची मदत तातडीने प्राप्त झाली.

Karjat, financial assistance of one lakh from Chief Minister's Assistance Fund to injured patient, MLA Ram Shinde visited patient in Bitkewadi, don't worry I am with you,

चैतन्य बिटके या रूग्णास नुकताच डिस्चार्ज मिळाला आहे. या रुग्णाची आमदार प्रा.राम शिंदे यांनी घरी जाऊन भेट घेतली. यावेळी आमदार शिंदे यांनी चैतन्यच्या प्रकृतीची विचारपूस केली.कोणतीही मदत लागो, काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे,असा दिलासा त्यांनी बिटके कुटुंबियांना दिला.आमदार शिंदे यांच्या या शब्दामुळे बिटके कुटूंबिय भावनिक झाले होते. यावेळी बिटके कुटुंबियांनी आमदार राम शिंदे यांचे आभार मानले.यावेळी माजी सरपंच दादासाहेब बिटके,गोविंद तांदळे, बाबासाहेब बिटके, गणेश बिटके सह आदी उपस्थित होते.

काही दिवसांपुर्वी माझ्या मुलाचा मोटारसायकल अपघात झाला होता.त्याच्यावर वेळेत चांगले उपचार झाले नसते तर त्याचा पाय कापावा लागला असता.आमदार प्रा.राम शिंदे यांनी माझ्या मुलाच्या उपचारासाठी मोठी मदत केली. त्यांच्या इतकी कोणीच मदत केली नाही. मुलाला ॲडमीट करण्यापासून ते डिस्चार्ज मिळेपर्यंत शिंदे साहेब सतत आमच्या संपर्कात होते. रात्री अपरात्री फोन करून सतत ते माहिती घेत होते. मदत उपलब्ध करून देत होते. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लाख रूपयांची मदत तसेच दवाखान्याच्या बिलात 25 हजाराची सुट आमदार प्रा.राम शिंदे यांच्यामुळे मिळाली. त्यांनी केलेल्या मदतीमुळे माझा मुलगा आज सुखरूप आहे.माझ्या मुलाच्या उपचारासाठी आमदार प्रा.राम शिंदे साहेब देवासारखे धावून आले.त्यांचे मनापासून आभार !

– बाबासाहेब बिटके (जखमी चैतन्यचे वडील)