जामखेड शहर सार्वजनिक भिमजयंती महोत्सव समितीची स्थापना, 9 ते 14 एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन
जामखेड टाइम्स वृत्तसेवा। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाची जय्यत तयारी देशभर सुरू आहे. जामखेड तालुक्यातही जयंती मोहउत्सवाची तयारी सुरू झाली आहे. जामखेड शहरात सार्वजनिक भिमजयंती महोत्सव समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी राजन समिंदर (सर) यांची निवड करण्यात आली आहे.यावेळी सर्वसमावेशक कार्यकारिणी स्थापन करण्यात आली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जामखेड शहरात महोत्सव समिती स्थापन करण्यासाठी नुकतीच भीमसैनिकांची बैठक पार पडली. या बैठकीत जयंती महोत्सवाची रूपरेषा ठरविण्याबरोबरच महोत्सव समितीची स्थापना करण्याचा निर्णय झाला.ही बैठक पोलिस निरीक्षक महेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली डाँ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह, जामखेड बाजारतळ येथे पार पडली. जयंती उत्सव समितीच्या वतीने 9 एप्रिल ते 14 एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आले.
या बैठकीला पोलीस निरीक्षक महेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ घायतडक, निखिल घायतडक, प्रभाकर सदाफुले सर,पोपट घायतडक, नामदेव गंगावणे सर, बौध्दाचार्य अशोक आव्हाड, बौद्धाचार्य गोकुळ गायकवाड, बौद्धाचार्य बलभीम जावळे,सुशीलकुमार सदाफुले,राजेंद्र सदाफुले, प्रविण घायतडक, मुकुंद घायतडक,रत्नाकर सदाफुले,प्रा.सुनिल जावळे, संजय घोडके सर,प्रताप पवार सर,दिपक तुपेरे सर,विनोद सोनवणे सर,रजनीकांत साखरे सर, संभाजी तुपेरे सर,ज्ञानदेव साळवे सर,सचिन आण्णा सदाफुले,बाबा सोनवणे, सुर्यकांत कदम सर, प्रा.राहुल आहिरे,सुहास आव्हाड सर,अभिमान घोडेस्वार सर, सदाशिव भालेराव सर, जितेंद्र आढाव सर,संदिप तुपेरे, सह आदी भिमसैनिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जामखेड शहर भीमजयंती महोत्सव समिती कार्यकारणी खालीलप्रमाणे
1) राजन समिंदर (सर) – अध्यक्ष
2) रवि सोनवणे – उपाध्यक्ष
3) रजनीकांत नाना मेघडंबर – खजिनदार
4) सिध्दार्थ साळवे( सर), डॉ. सचिन घायतडक, सचिन (जाॅकी) सदाफुले यांची सल्लागार म्हणून निवड करण्यात आली.