jamkhed news | 510 किलो गांजा (cannabis) जप्त : खर्ड्यातील दोघे गजाआड; लोणी पोलिसांनी धडक कारवाई;

गांजा तस्करीचे रॅकेट उध्वस्त : ८० लाखाचा मुद्देमाल हस्तगत  

जामखेड टाईम्स वृत्तसेवा :  गांजाची अवैधरित्या तस्करी (cannabis) करत असलेल्या दोघांच्या मुसक्या आवळण्याची धडक कारवाई पोलिसांनी केली आहे. या कारवाईत तब्बल ८० लाख रूपये किमतीचा ५१० किलो गांजाचा साठा (Cannabis stocks) हस्तगत झाला आहे. इतका मोठा साठा सापडल्याने पोलिस दलही चक्रावून गेले आहे. या प्रकरणात जामखेड (jamkhed news) तालुक्यातील दोघा गांजा तस्करांना पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे.ही धडाकेबाज कारवाई लोणी (shirdi news) पोलिसांनी पार पाडली आहे. (loni Police have arrested two cannabis smugglers from Jamkhed taluka)

jamkhed news | जामखेड तालुक्यातील खर्डा परिसर अवैध्य धंद्यांचा जणू अड्डाच बनला आहे.(The Kharda area of ​​Jamkhed taluka has become a haven for illegal traders) मागील काही दिवसांपुर्वी या भागातून बनावट दुध बनवण्याचे दोन मोठे रॅकेट उघडकीस आले होते. आता याच भागातून गांजाची अवैधरित्या तस्करी केली जात असल्याचे रॅकेट उघडकीस आले आहे.

शिर्डीच्या लोणी (Shirdi – loni) पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात खर्ड्यातील (Kharda) दोघांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. तब्बल ८० लाख रूपये किमतीचे ५१० किलो गांजा (cannabis) लोणी पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईमुळे जामखेड तालुका (jamkhed news)  पुन्हा एकदा राज्यात चर्चेत आला आहे.

याबाबत सविस्तर असे की, लोणी (shirdi news) पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक समाधान पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत लोणी – संगमनेर मार्गावर (दि २६ रोजी) रात्रीची गस्त घालत असताना त्यांना एका वाहनाचा संशय आला. यावेळी पोलिसांनी सदर वाहन अडवून चौकशी केली असता गाडीतील इसमांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने पोलिसांनी गाडी ताब्यात गाडीची झडती घेतली असती गाडीत अनेक गोण्या होत्या. वर ठेवलेल्या गोण्यांमध्ये नारळाचा भुसा भरलेला होता, मात्र खालील काही गोण्यांची तपासणी केली असता त्यात गांजा व गुंगीची औषधे असल्याचे आढळून आले. (jamkhed news)

jamkhed news, two-arrested-from-kharda-in-cannabis-smuggling-case
jamkhed-news-two-arrested-from-kharda-in-cannabis-smuggling-case

या कारवाईत लोणी  (shirdi news) पोलिसांना 20 गोण्यांमधून तब्बल पाचशे दहा किलो गांजाचा साठा मिळून आला. पोलिसांनी गांजातस्करी करणारे वाहन व सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. वाहनचालक राहुल बाबासाहेब पवार (वय 32, रा. कसबा गल्ली, खर्डा) व दत्ता मारुती चव्हाण (वय 35) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दरम्यान घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक संजय सातव यांनी तातडीने भेट दिली. त्यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला. (jamkhed news)

अवैध गांजाची तस्करी करणाऱ्या वाहनाची झडती घेत लोणी पोलिसांनी अंदाजे ७५ लाख रुपये किमतीचा ५१० किलो गांजा व ०५ लाख रुपये किमतीची गाडी (गाडी नंबर – MH 25 P 1294) असा मुद्देमाल  जप्त केला. पकडलेल्या वाहनात वर नारळाच्या भुश्याच्या गोण्या होत्या, तर खाली गांज्याच्या गोण्या ठेवलेल्या होत्या. लोणी(shirdi news) पोलिसांनी केलेली ही कारवाई जिल्ह्यातील मोठी कारवाई समजली जात आहे. या कारवाईच्या पथकात उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव, पोलिस निरीक्षक समाधान पाटील यांच्यासह पोलिस नाईक दीपक रोकडे, पोलिस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र औटी, सहायक फौजदार बाबासाहेब लबडे, संपत जायभाये, कैलास भिंगारदिवे यांचा समावेश होता.

” जामखेड तालुक्यातील खर्डा येथून तब्बल ५१० किलो गांजा  घेऊन जाणारी गाडी  जामखेड – आष्टी – अहमदनगर मार्गे लोणी पर्यंत जाऊस्तोवर कुणीच का आडवली नाही ? ही गाडी बिनबोभाट गेली परंतु लोणी पोलिसांच्या चाणाक्षपणामुळे गांजा तस्करीचा भांडाभोड झाला. इतका मोठा गांजा नेमका कुठून आणला गेला ? कुठे जाणार होता ? खर्डा भागात गांजा शेती फुलतेय का ? की बाहेर गावाहून खर्ड्यात गांजा आणून तो राज्यात वितरित तर केला जात नाही ना ? या रॅकेटचा मास्टर माईंड कोण? यासह अनेक प्रश्न आता ऐरणीवर आले आहेत. दरम्यान खर्डा परिसरात अवैध धंद्यांना आलेला ऊत पोलिसांची डोकेदुखी बनत चालला आहे. आता या भागात पोलिसांकडून मोठी धडक कारवाई होणार का ? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.”  (jamkhed news)

 

web taital – jamkhed-news-two-arrested-from-kharda-in-cannabis-smuggling-case