health department | खुशखबर : अहमदनगर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात 555 जागांची मेगाभरती !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा :  अहमदनगर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने (health department) विविध पदांची मेगाभरती काढली आहे. तब्बल 555 जागांसाठी ही भरती केली जाणार आहे (555 posts will be filled) तशी अधिसूचना सरकारकडून जारी करण्यात आली आहे. या भरतीमुळे 2019 पासुन नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या अनेकांचे स्वप्न आता पुर्ण होणार आहे. (Mega recruitment Ahmednagar Zilla Parishad 2021 )

जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील गट क संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी माहे मार्च 2019 मध्ये शासनाच्या महाआयटी मार्फत महापोर्टलवर जाहीरात प्रसिध्द करण्यात आली होती. परंतु तत्कालीन परिस्थितीत महापोर्टल बंद झाल्याने सदरची परिक्षा प्रक्रिया पुर्ण होऊ शकली नाही.

दरम्यान कोविड-19 साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर तसेच इतर साथ रोगाची शक्यता लक्षात घेता ग्रामीण भागातील जनतेला तात्काळ आरोग्य सेवा मिळणे आवश्यक असल्याने ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाशी (health department) संबंधीत आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता या चार संवर्गातील माहे मार्च 2019 मध्ये दिलेल्या जाहिरातीमधील नमूद सर्व रिक्त पदांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

health department
Mega recruitment Ahmednagar Zilla Parishad 2021

 

अहमदनगर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात (health department) औषध निर्माण अधिकारी (Medicine Officer),आरोग्य सेवक (Health Worker Male), आरोग्य सेविका (Health Worker Female), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) या पदांसाठी मेगाभरती होणार आहे. चारही संवर्गात एकुण 555 जागा भरल्या जाणार आहेत. तशी जाहिरात जिल्हा परिषदेने जारी केली आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2021 आहे. वरिल चारही पदांसाठी संबंधित पदानुसार शिक्षण आवश्यक राहिल.

 

माहे मार्च 2019 मध्ये आरोग्य विभागाशी (health department) संबंधित पदांकरिता आवेदनपत्र सादर केलेल्या सर्व उमेदवारांसाठी खालीलप्रमाणे सुचना देण्यात येत आहेत

1) माहे मार्च 2019 मधील जाहिरातीनुसार आरोग्य विभागाशी संबंधित पदांकरिता अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवारांनी www.maharddzp.com या संकेतस्थळावर जाऊन Login ID व Password create करणे आवश्यक आहे.

2) माहे मार्च 2019 मध्ये आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व औषध निर्माता या 4 संवर्गाकरिता आवेदनपत्र / अर्ज सादर केलेल्या उमेदवारांपैकी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (SEBC) प्रवर्गातील उमेदवारांव्यतिरिक्त इतर प्रवर्गातून अर्ज सादर केलेले उमेदवार संबंधित प्रवर्गातून परीक्षेकरिता पात्र राहतील.

3) मा. सर्वोच्च न्यायालयाने विषेश अनुज्ञा याचिका क्रमांक 15737/2019 व इतर याचिकांमध्ये शासकीय नोक यांमधील नियुक्त्यांसाठी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे (SEBC) आरक्षण ठरविले आहे. सामान्य प्रशासन विभागाने सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास (SEBC) प्रवर्गातील घटकांना खल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा लाभ देण्याबाबत क्रमांक राआधो-4019/प्र.क्र.31/16-अ डिसेंबर 2020 च्या शासन निर्णयान्वये मान्यता दिली आहे.

यानुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मा 5/8 उमेदवारांना खुल्या प्रवर्गात अथवा आर्थिकदृष्टया दुर्बल प्रवर्गातून (EWS) आरक्षणाचा लाभक असंतु या अनुषंगाने सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास (SEBC) प्रवर्गातुन अर्ज सादर केलेल्या उमेदवाराने आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गाबाबत (EWS) अथवा खुल्या प्रवर्गाबाबत वरीलप्रमाणे नमुद संकेतस्थळावर दिनांक 01 सप्टेंबर 2021 ते 14 सप्टेंबर 2021 या कालावधीत विकल्प द्यावेत.

उमेदवाराने एकदा दिलेल्या विकल्पामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करता येणार नाही. तथापि, ज्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (SEBC) प्रवर्गातील उमेदवाराने आर्थिकदृष्टया मागास (EWS) प्रवर्गाचा विकल्प दिला आहे, त्याने परिक्षेपूर्वी सक्षम अधिका-यांचे आर्थिकदृष्टया मागास (EWS) प्रवर्गाचे प्रमाणपत्र जिल्हा निवड समितीकडे सादर करणे बंधनकारक आहे. परिक्षेच्या दिनांकानंतर सादर केले जाणारे आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे (EWS) प्रमाणपत्र ग्राहय धरले जाणार नाही.(health department)

4) जे सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास (SEBC) प्रवर्गातील उमेदवार खुल्या प्रवर्गाचा विकल्प देतील ते उमेदवार अथवा जे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (SEBC) प्रवर्गातील उमेदवार आर्थिकदृष्ट्या मागासप्रवर्गाचा विकल्प सादर करणार नाहीत. तथापी खुल्या प्रवर्गातील वयोमर्यादेकरिता पात्र आहेत अशा उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील उमेदवार म्हणून गणण्यात येईल. अशा उमेदवारांना खुल्या प्रवर्गासाठी लागु असलेले परिक्षा शूल्क (या पुर्वी एसईबीसी प्रवर्गातुन अदा केलेली रक्कम वगळता उर्वरीत रक्कम) परिक्षेपुर्वी अदा करणे आवश्यक राहील. सदर उमेदवारांनी दिनांक 01 सप्टेंबर 2021 ते 14 सप्टेंबर 2021 या कालावधीत वरीलप्रमाणे नमूद संकेतस्थळावरुन शुल्क अदा करण्याचे उपलब्ध पर्याय वापरून शुल्क अदा करणे बंधनकारक राहील.(health department)

5) माहे मार्च 2019 च्या जाहिरातीनुसार ऑनलाईन परिक्षेकरिता उमेदवारांना एक किंवा एकापेक्षा जास्त जिल्हा परिषदांसाठी अर्ज करण्याची मुभा होती. तथापि, आता शासनाचे महापरिक्षा पोर्टल झाल्याने सदरची आरोग्य विभागाशी संबंधीत पदभरती ही OMR Vendor मार्फत Offline पध्दतीने राबविण्यात येणार असल्याने उपरोक्त 4 संवर्गातील प्रत्येक संवर्गाची परिक्षा राज्यात सर्व जिल्हा परिषदांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात येणार आहे.त्यामुळे उमेदवाराला एकाच जिल्हा परिषदेमधुन परीक्षा देता येईल. यासाठी ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त जिल्हा परिषदांमध्ये रिक्त पदांकरिता अर्ज सादर केले आहेत, अशा उमेदवारांनी परिक्षेकरिता एकाच जिल्हा परिषदेचा विकल्प वरिलप्रमाणे नमूद संकेतस्थळावर दिनांक 01 सप्टेंबर, 2021 ते 14 सप्टेंबर 2021 या कालावधीपर्यंत नोंदविणे आवश्यक राहिल. (health department)

सातव्या वेतन आयोगानुसार मिळणार इतका पगार (health department)

1) औषध निर्माण अधिकारी (Medicine Officer) – 29,200 – 92,300 रुपये प्रतिमहिना
2) आरोग्य सेवक (Health Worker Male) – 25,500 – 81,100 रुपये प्रतिमहिना
3) आरोग्य सेविका (Health Worker Female) – 25,500 – 81,100 रुपये प्रतिमहिना
4) प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) – 35,500 -1,12,400 रुपये प्रतिमहिना