जामखेड ब्रेकिंग : रत्नदीपचे विद्यार्थी पुन्हा उतरणार रस्त्यावर, विद्यार्थ्यांनी ‘या’ कारणासाठी दिली रास्ता रोको अंदोलनाची हाक !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : रत्नदिप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटरचा संस्थापक डाॅ भास्कर मोरे (dr Bhaskar More Jamkhed) विरोधातील अंदोलन राज्यात प्रचंड गाजले.या अंदोलनाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली.त्यानुसार रत्नदीपविरोधात कारवाई हाती घेण्यात आली आहे. परंतू आता एका नोडल ऑफिसरच्या (Jotsna Budhgaonkar) मनमानी कारभाराविरोधात रत्नदीपच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा अंदोलनाची हाक दिली आहे. याबाबत जामखेडचे तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांना शुक्रवारी निवेदन देण्यात आले आहे.

Jamkhed Breaking, Students of Ratnadeep medical college will take to streets again, for this cause call for rasta roko movement, Jotsna Budhgaonkar news,

रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटरचा संस्थापक भास्कर मोरे हा मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थी आणि विद्यार्थींनीचे शारीरिक मानसिक व आर्थिक छळवणूक करत असल्याच्या निषेधार्थ रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या शेकडो विद्यार्थ्यांनी आक्रमक अंदोलन केले.रत्नदीपच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संबंधित विद्यापीठांनी नोडल ऑफिसरची नेमणूक केली आहे.यातून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची व्यवस्था निर्माण केली आहे. परंतू आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.

महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ नर्सिंग अँड पॅरामेडिकल एज्युकेशन या सरकारी संस्थेने नेमलेल्या नोडल ऑफिसर सौ जोत्स्ना बुधगावकर (Maharashtra State Board of Nursing and Paramedical Education Nodal Officer Jotsna Budhgaonkar) यांच्या मनमानी कारभाराविरोधात तसेच संशयास्पद भूमिकेविरोधात रत्नदीपचे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.

महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ नर्सिंग अँड पॅरामेडिकल एज्युकेशन या सरकारी संस्थेने नेमलेल्या नोडल ऑफिसर सौ जोत्स्ना बुधगावकर ह्या वेळोवेळी जामखेडला आल्या,त्यांची नेमणूक विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी करण्यात आलेली आहे.परंतू त्यांनी रत्नदीप संस्थेशी आर्थिक तोडजोडी केल्याचा संशय आहे. संस्थेशी हातमिळवणी केल्यामुळेच त्या मनमानी कारभार करत आहेत. विद्यार्थ्यांची जाणीवपूर्वक त्या पिळवणूक करत आहेत. त्यामुळे जोत्स्ना बुधगावकर यांची नोडल ऑफिसर पदावरून तात्काळ हकालपट्टी (नियुक्ती रद्द) करून दुसर्‍या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी, या मागणीसाठी विद्यार्थी व सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत.

Jamkhed Breaking, Students of Ratnadeep medical college will take to streets again, for this cause call for rasta roko movement, Jotsna Budhgaonkar news,

महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ नर्सिंग अँड पॅरामेडिकल एज्युकेशन या सरकारी संस्थेने नेमलेल्या नोडल ऑफिसर जोत्स्ना बुधगावकर यांची नियुक्ती रद्द न झाल्यास उद्या 30 मार्च 2024 रोजी जामखेड शहरातील खर्डा चौक येथे रत्नदीपचे सर्व विद्यार्थी व जामखेड मधील नागरिक, सामाजिक संघटना यांच्यावतीने बेमुदत रस्ता रोको आंदोलन हाती घेतले जाणार आहे. या अंदोलनावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास जोत्स्ना बुधगावकर यांना जबाबदार धरण्यात यावे, असे निवेदन जामखेड तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले आहे.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत, मनसेचे तालुकाध्यक्ष प्रदिप टापरे, शिवप्रतिष्ठानचे पांडुरंग भोसलेंसह विद्यार्थ्यांनी वरिल मागण्यांचे निवेदन शुक्रवारी प्रशासनाला दिले आहे.

शितल कलेक्शन जामखेड