जामखेडमध्ये सोमवारी होणार जय मल्हार फेम बानूचा जलवा

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । राज्यात दंडीहंडीचा उत्सव शिगेला पोहचला आहे. जामखेडमध्येही सोमवारी भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेत जय मल्हार फेम बानूचा जलवा जामखेडकरांना अनुभवता येणार आहे. जामखेडच्या इतिहासात पहिल्यांदाच असा भव्य कार्यक्रम होणार आहे.

Jai Malhar fame Banu Jalwa will be held in Jamkhed on Monday

कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जामखेडला 22 ऑगस्ट 2022 रोजी भव्य दही हंडी सोहळा पार पडणार आहे. या स्पर्धेतील विजेत्याला 1 लाख 111 रूपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. या दहीहंडीसाठी जय मल्हार फेम लोकप्रिय अभिनेत्री ईशा केसकर अर्थात बानू उपस्थित राहणार आहे. या दहीहंडी साठी मोठ्या प्रमाणावर बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

दि. 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता जामखेड शहरातील श्री नागेश विद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेची जामखेडकरांना मोठी उत्सुकता लागली आहे. या स्पर्धेत राज्यभरातील गोविंदा पथके मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 9696330330 नंबरवर काॅल करून स्पर्धकांनी आपली नोंदणी करायची आहे. तसेच या स्पर्धेत स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा असे आवाहन आमदार रोहित पवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Jai Malhar fame Banu Jalwa will be held in Jamkhed on Monday