जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेड शहरातील ल. ना होशिंग विद्यालयात उभारण्यात आलेल्या वनौषधी उद्यानास शनिवारी जामखेड तालुका मिडीया क्लबने भेट देत पाहणी केली.
ल. ना. होशिंग विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत होशिंग यांच्या संकल्पनेतून पुस्तकातली झाडे विद्यालयाच्या अंगणात अवतरली आहेत. विद्यालयातील मुख्य मैदानाच्या कडेला दुर्मिळ वनौषधींचे उद्यान साकारण्यात आले आहे. या उद्यानात 37 प्रकारच्या दुर्मिळ वनौषधींची लागवड करण्यात आली आहे.
जामखेड तालुका मिडीया क्लबने शनिवारी ल.ना. होशिंग विद्यालयात उभारण्यात आलेल्या वनौषधी उद्यानाला भेट दिली. विद्यालयाने हाती घेतलेल्या उपक्रमाची सविस्तर माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक शिक्षण देण्याच्या उपक्रमाचे मिडीया क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी कौतूक केले.
यावेळी प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी या उपक्रमाची सविस्तर माहिती पत्रकारांना दिली. यावेळी तालुकाध्यक्ष सुदाम वराट, सचिव सत्तार शेख, मिडीया क्लबचे पदाधिकारी किरण रेडे, अविनाश बोधले, संजय वारभोग, धनराज पवार, राजू भोगील, अजय अवसरे सह आदी उपस्थित होते.