जामखेड : अहमदनगर जिल्हा बँक निवडणुकीत तात्यांना दिलेला शब्द मी पाळला – आमदार प्रा राम शिंदे

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। बाजार समितीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर जामखेड तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जामखेड तालुक्यात दोन पॅनल होणार की तीन याची उत्सुकता आहे. भाजपने पक्षाची बैठक घेत निवडणूक रणनिती ठरवली आहे. मागील वेळी झालेल्या निवडणुकीत भाजप – राष्ट्रवादी युती झाली होती. यंदाच्या निवडणुकीत हे दोन्ही पक्ष ऐकमेकांविरोधात उभे ठाकणार आहेत. त्यादृष्टीने दोन्ही पक्षांनी तयारी हाती घेतली आहे.भाजपची नुकतीच बैठक पार पडली, या बैठकीत आमदार प्रा राम शिंदे यांनी जिल्हा बँक निवडणुकीवेळी घडलेला किस्सा कार्यकर्त्यांना सांगितला. अहमदनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सहकार महर्षी स्वर्गीय जगन्नाथ तात्या राळेभात यांना पाठिंबा दिला यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले.

I kept my promise to Sahkar Maharshi Late Jagannath tatya Ralebhat in Ahmednagar District Bank Election mla Prof. Ram Shinde

राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढवणार,अशी बातमी आली होती. त्यामुळं त्यांना वाटलं मी लढणार, त्यावेळी माझ्याकडे आपल्या बाजूचे 18 मतं होती. 18 मतावर आपल्याला सहा ते सात मतांची गरज होती. त्यामुळे निवडून येण्याची अडचणच नव्हती, पण समोरच्या थोरात गटाकडून सुध्दा मला वरच्या जागेवर फाॅर्म भरण्यासाठी ऑफर आली होती. परंतू मी विचारपूर्वक निर्णय करणारा कार्यकर्ता आहे, त्यावेळी माझ्याकडे तात्या (स्वर्गीय सहकार महर्षी जगन्नाथ राळेभात) आले. त्यांनी बँकेचा विषय माझ्यापुढे मांडला. आणि मी त्यांचा आदर ठेवला. मी म्हणलं, तात्या तुम्हाला इकडं यायची गरज नव्हती, तेव्हा तात्या म्हणले, जाऊ द्या, आमच्याकडून मुलांकडून चुकलयं, तेव्हा मी तात्यांना बोललो, तुम्हाला माझा पाठिंबा.मी काही निवडणूक लढवणार नाही आणि त्यांनी पाठिंबा मागितल्यावर तर विषयच संपला, मी तात्यांना शब्द दिला आणि पाळला.

I kept my promise to Sahkar Maharshi Late Jagannath tatya Ralebhat in Ahmednagar District Bank Election mla Prof. Ram Shinde

मी आणि तात्या एकत्र झाल्याच्यानंतर आमदाराला फाॅर्म भरता आला नाही, ना सुचक मिळत होता, ना उमेदवार मिळत होता, बळच दम देऊन, पळून नेऊन, दडपशाही करून, उमेदवार मिळवला, जबरदस्तीने फाॅर्म मंजुर केला. बँकेच्या निवडणुकीत त्रास दिल्यामुळे ते तिकडं गेलेत, त्यात माझी काय चुकयं, माझ्याकडे मतं असताना मी फाॅर्म भरला नाही किंवा माझ्या कार्यकर्त्यांनी कोणी फाॅर्म भरला नाही, पण ते तिकडं गेले, ज्यांनी त्रास दिला त्यांच्याकडे ते गेले, असे म्हणत राळेभात भावंडांनी घेतलेल्या भूमिकेवर आमदार प्रा.राम शिंदे यांनी भाष्य केले.

बाजार समितीच्या निवडणुकीत आता ते प्रचार काय करणार ? ह्यांनी आम्हाला त्रास दिल्यामुळं ह्यांचा अन् आमचा पॅनल झाला असं म्हणणार? की राम शिंदेंनी आम्हाला मदत केली म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात उभे आहोत असं सांगणार ? निवडणूक लागल्यावर या साऱ्या प्रश्नाची उत्तरे द्यावी लागतात, आणि ती द्यावी लागतील, असे म्हणत आमदार प्रा.राम शिंदे यांनी बाजार समिती निवडणूकीचे रणशिंग फुंकले. आमदार प्रा.राम शिंदे यांचा रोख यातून स्पष्ट दिसून येत होता. त्यामुळे अगामी काळात मोठ्या उलथापालथी होताना दिसणार आहेत. हेच यातून स्पष्ट होत आहे.