मी सुध्दा भगवान टोळीचा शिकार, उद्योजक रमेश आजबेंचा माजी सभापती भगवान मुरुमकर यांच्या विरोधात गंभीर आरोप, व्यापाऱ्यांंनो अंदुरे कुटुबांच्या पाठीशी ठामपणे उभे रहा- रमेश आजबे यांचे अवाहन !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेड शहर परिसरात सध्या भगवान टोळी कार्यरत आहे, या टोळीने अत्तापर्यंत 10 ते 15 व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल केलेलं आहे, त्यांना दमदाटी केली जाते, त्यांच्या दारात माणसं उभा करून दहशत निर्माण केली जाते, मी सुध्दा या टोळीचा शिकार आहे, असा स्फोटक दावा उद्योजक रमेश आजबे यांनी केल्याने जामखेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

I am also victim of bhagwan murumkar Gang - Ramesh Aajabe explosive claim

जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती भगवान मुरुमकर आणि त्यांच्या सात सहकाऱ्यांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर या प्रकरणात आता आणखीन गंभीर वळण लागले आहे. उद्योजक रमेश आजबे यांनी डाॅ भगवान मुरुमकर यांच्याविरोधात गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. आजबे यांनी पत्रकार परिषद घेत आरोपांची राळ उडवून दिली आहे.

यावेळी बोलताना रमेश आजबे म्हणाले की, अंधुरे परिवाराने काल परवा जो गुन्हा दाखल केलाय, त्याच्यातील सर्व आरोपी भगवान टोळीचे सदस्य आहेत,भगवान टोळी म्हणजे या टोळीचे अध्यक्ष माजी सभापती भगवान दादा मुरुमकर हे आहेत, या टोळीचे सात सदस्य आहेत.ब्लॅकमेलिंगचा प्रसंग फक्त अंदुरे परिवारासोबतच नाही तर माझ्या सोबत पण घडलेला आहे असा गंभीर आरोप रमेश आजबे यांनी केला आहे.

माझ्या जागेचा विषय संपवावा, कुठे भांडण तंटा नको म्हणून मी त्यांना पैसे दिले, व्यापारी म्हणून काम करत असताना व्यापाऱ्याला वाटतं की, आपली कोणाबरोबर दुश्मनी नको किंवा भांडण तंटा नको म्हणून मी त्यांना पैसे दिले.पैसे दिल्यानंतर माझ्या दुकानाच्या चाव्या आणून दिल्या.

I am also victim of bhagwan murumkar Gang - Ramesh Aajabe explosive claim

त्यानंतर आठ दिवसाने माझे कर्मचारी आरोळेवस्तीवरील माझा गाळा उघडायला गेले असता माझ्या माणसांना दमदाटी करून पुन्हा रिटर्न गाळ्याच्या चाव्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी घेतल्या, हा सगळा प्रकार भगवान मुरुमकर यांच्या सांगण्यावरून झाला, असे आजबे म्हणाले.

भगवान मुरुमकर यांनी आठ ते दहा दिवसांपुर्वी मध्यस्थामार्फत मला तहसीलच्या परिसरात बोलावून घेतले. भगवान मुरुमकर यांनी विचारले की रमेशराव काय करायचं? ह्यांना काही चार पाच लाख रूपये देऊन काही मांडवली करता येईल का ?  असे मुरुमकर आपल्याला बोलल्याचा आरोप आजबे यांनी केला आहे.

रमेेश आजबे पुढे बोलताना म्हणाले की, भगवान मुरुमकर सारखा सभापती राहिलेला माणूस गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांची सतत मधस्थी करतो, याचा अर्थ हाच ह्यांचा पोशिंदा आहे.असा खळबळजनक आरोप आजबे यांनी यावेळी बोलताना केला.

I am also victim of bhagwan murumkar Gang - Ramesh Aajabe explosive claim

आजबे पुढे म्हणाले की, पोलिस स्टेशनला पण ह्यांच्यावर ॲक्शन घेऊ नका असं वारंवार डिपार्टमेंटला भगवान मुरुमकर यांचे फोन जातात, मग भगवान मुरुमकरला पाठीमागून साथ कोण देतयं? त्यांच्या मागं आणखी कोण उभा आहे ? ते पोलिस डिपार्टमेंटने तपासावे असे अवाहन आजबे यांनी केले.

अंदुरे कुटूंबावर गुंडांनी प्राणघातक हल्ला केला, अंदुरे कुटूंबाची आब्रु घालण्याचं काम भगवान मुरुमकर हे करतायेत, वास्तविक पाहता अंदुरे परिवाराला बदनाम कसं करायचं, त्यांचं वस्त्रहरण केल्यासारखं काही तरी खोटे आरोप लावायचे, पण या लोकांचे ऑडिओ, व्हिडीओ सर्व पुरावे अंदुरे परिवाराकडे आहेत, त्यांचा रितसर गुन्हा दाखल आहे, खरं पाहता अंदुरे परिवार जामखेडच्या बाजारपेठेतील प्रतिष्ठित फॅमिली आहे. अत्तापर्यंत या परिवारावर साधी एनसी सुध्दा दाखल नाहीये, ह्यांनी मात्र त्यांचं राजरोस वस्त्रहरण करायचं अशी परिस्थिती जामखेड शहरात चालली आहे, असे आजबे म्हणाले.

हे लोक ॲट्राॅसिटीची भीती घालतात…

आजबे पुढे म्हणाले की, अंदुरेच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या पोरांनी पेठेतल्या एका व्यापाऱ्याच्या गाळ्याला कुलूप लावलं, त्याच्याकडून 10 ते 11 लाख रूपये घेण्यात आले, तसेच शहरातील एका मोबाईल शाॅपी वाल्याला दम दिला, तसेच एका सांस्कृतिक कला केंद्रावाल्यालाही दम दिल्याचे प्रकार घडले आहेत, यांच्याविरोधात तक्रार करण्यासाठी लोकं का पुढे येत नाहीत, कारण, हे लोक ॲट्राॅसिटीची भीती घालतात. तसेच हाणमार करू, अश्या धमक्या देतात, असे आजबे म्हणाले.

I am also victim of bhagwan murumkar Gang - Ramesh Aajabe explosive claim

तर जामखेडची व्यापारपेठ बंद होईल

जामखेडमधील व्यापारी वर्गाला माझी विनंती आहे की,आज अंदुरे परिवारावर वेळ आलेली आहे, माझ्यावर आलेली आहे, मी सक्षम आहे. परंतू उद्या तुमच्यावर पण ही वेळ येणार आहे. म्हणून जामखेडमधील सर्व व्यापाऱ्यांंनी अंदुरे परिवाराच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे, भगवान टोळी ही जी काही दहशत जामखेडमध्ये पसरवत आहे, ह्या टोळीला कुठं तरी आवर घालण्याचं काम जामखेडच्या जनतेनं केलं पाहिजे, जर असे नाही झाले तर जामखेडची व्यापारपेठ बंद होईल अशी भीती यावेळी उद्योजक रमेश आजबे यांनी व्यक्त केली.

गुन्हा दाखल होऊन दोन दिवस होऊनही आरोपी अजूनही मोकाट आहेत, ते सर्वजण अंदुरे परिवाराच्या दुकानासमोर मोकाट फिरत आहेत, त्यांच्या दारात गाड्या लावून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी ते करत आहेत, वास्तविक पाहता सर्वसाधारण माणसावर कुठलाही गुन्हा दाखल झाला की हे पोलिस प्रशासन त्याच दिवशी बसवून ठेवत, मात्र या प्रकरणामध्ये दोन माणसं अहमदनगरला ॲडमीट असताना सुध्दा आरोपी हे मोकाट फिरत आहेत, हे दिसत असून सुध्दा पोलिस उचला उचलीची कारवाई करत नसल्यामुळे ह्यांचे दंड अधिक बळकट होत चाललेत, त्यामुळे माझी पोलिस प्रशासनाला विनंती आहे की, या प्रकरणासह माझ्या प्रकरणात ॲक्शन घेऊन तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी उद्योजक रमेश आजबे यांनी केली.