Food poisoning | धक्कादायक: 89 विद्यार्थीनींना अन्नातून विषबाधा  : पुणे जिल्ह्यातील घटनेने उडाली मोठी खळबळ

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : 89 मुलींना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातून समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विषबाधा झालेल्या काही विद्यार्थीनींवर पुण्याच्या ससून रुग्णालयात (Sassoon Hospital Pune) उपचार करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. (Food poisoning of 89 girls at NavGurukul Pune Campus Khopi in Bhor taluka)

याबाबत सविस्तर असे की, पुणे जिल्ह्यातील खेड-शिवापूर टोल प्लाझा जवळील खोपी (ता.भोर) येथील फ्लोरा इन्स्टिट्यूटच्या (Flora Institute of Technology ) आवारात नवगुरुकुल पुणे कॅम्पस (NavGurukul Pune Campus) आहे. या ठिकाणी मुलींसाठी निवासी संगणक प्रशिक्षण वर्ग चालवले जाते.

सध्या या नवगुरूकुल पुणे कॅम्पसमध्ये 202 मुली साॅप्टवेअर प्रोफेशनलचे प्रशिक्षण (Training of software professionals) घेतात. या शिक्षण संस्थेतील तब्बल 89 विद्यार्थीनींना अन्नातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवार दि 28 डिसेंबर रोजी समोर आला आहे. (Food poisoning of 89 girls at NavGurukul Pune Campus Khopi in Bhor taluka)

खोपी येथील नवगुरुकुल पुणे कॅम्पसमध्ये (NavGurukul Pune Campus in khopi ) संगणकाचे शिक्षण घेणाऱ्या 202 विद्यार्थिनींना रविवारी (26 डिसेंबर) रात्रीच्या जेवणात पनीरची भाजी, पुरी आणि भात असे जेवण मुलींनीच शिजवले होते. तेथील सर्व मुलींनी हेच जेवण केले होते.

परंतु सोमवार दि 27 डिसेंबर रोजीच्या रात्री काही मुलींना पोटदुखी, मळमळ व उलटीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे या मुलींनी खेड शिवापूर येथील श्र्लोक हाॅस्पीटलमधील बाह्य रुग्ण विभागातून औषधोपचार घेतला.

Food poisoning of 89 girls at NavGurukul Pune Campus Khopi in Bhor taluka

मंगळवार दि 28 डिसेंबर रोजी एकूण 89 मुलींना पोटदुखी, मळमळ व उलटीचा त्रास होत असल्याने त्यातील 24 मुली भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात तर 7 मुली पुणे येथील ससून रुग्णालयात उपचारासाठी गेल्या होत्या.

यातील आठ मुलींना भोर उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी अ‍ॅडमिट करण्यात आले आहे. तर सात मुलींवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत असा अहवाल भोर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी पुणे जिल्हा आरोग्य विभागाला दिला आहे.

दरम्यान उर्वरित 58 मुलींवर गुरुकुलमध्ये उपचार केले जात असून, सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती भोर तालुका आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. या घटनेमुळे भोर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान खोपी हे गाव नसरापुर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत  आहे. संबंधित घटना उजेडात येताच तालुका आरोग्य विभागाच्या पथकाने नवगुरुकुलमला भेट देऊन पाहणी केली. आरोग्य विभागाकडून पाणी आणि अन्नाचे नमुने ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

नवगुरुकुलम च्या कॅम्पसमध्ये शिक्षण घेत असलेल्या 202 मुलींपैकी बहूतांश मुली परराज्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या घटनेसंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. (Food poisoning of 89 girls at NavGurukul Pune Campus Khopi in Bhor taluka)

घटनेची माहिती मिळताच मुलींच्या पालकांमध्ये मोठी चिंता पसरली आहे. सदर घटनेप्रकरणी संबंधित शिक्षण संस्थेविरोधात प्रशासनाकडून  काय कारवाई होणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.